वीज पडून मु्त्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:18 IST2021-07-12T04:18:06+5:302021-07-12T04:18:06+5:30

घोसरी : मूल तालुक्यातील मौजा- बोंडाळा (खुर्द) येथील गयाबाई पोरटे व विलास नागापुरे यांचा वीज पडून जागीच मृत्यू ...

A helping hand to the families of those killed in the lightning strike | वीज पडून मु्त्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात

वीज पडून मु्त्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात

घोसरी : मूल तालुक्यातील मौजा- बोंडाळा (खुर्द) येथील गयाबाई पोरटे व विलास नागापुरे यांचा वीज पडून जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर झाले. मृतकाच्या कुटुंबातील वारसांना हेल्पिंग हॅण्ड ग्रुप पोंभुर्णा व शिवशाही युवा मंच वेळवा यांच्याकडून प्रत्येकी ११ हजार ५०० रुपयांची मदत देण्यात आली.

शेतात काम करीत असताना आठवड्यापूर्वी पावसासह विजेचा कडकडाट होत असताना त्यांनी झाडाचा आश्रय घेतला होता; परंतु झाडाजवळ त्यांच्या अंगावरच वीज पडल्याने विलास नागापुरे व गयाबाई पोरटे यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे हेल्पिंग हॅण्ड ग्रुप व शिवशाही युवा मंचच्या माध्यमातून मदतीचा हात म्हणून जमा केलेल्या २३ हजार रुपयांतून त्या दोन कुटुंबातील वारसांना प्रत्येकी ११ हजार ५०० रु. प्रदान करण्यात आले. यावेळी डॉ. अमोल बावणे, श्रीकांत शेंडे, पंकज निमसरकार, सुनील कावटवार, रोशन गुरनुले, कैलास पवार, मुकेश ठाकरे तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

110721\img-20210708-wa0055.jpg

विज पडून मु्त्यू पावलेल्यांच्या कुटुंबातील वारसांना मदतीचा हात

Web Title: A helping hand to the families of those killed in the lightning strike