शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बोनम्यारोग्रस्त निशाच्या मदतीसाठी लग्न समारंभात लावला मदत स्टॉल

By admin | Updated: June 22, 2017 00:39 IST

येथील निशा मैती ही बोनम्यारो या दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. तिच्या शस्त्रक्रियेकरिता १० लाखांचा खर्च येणार आहे.

वरोरा येथील उपक्रम : गोंडे परिवाराचा समाजापुढे नवा आदर्श लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : येथील निशा मैती ही बोनम्यारो या दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. तिच्या शस्त्रक्रियेकरिता १० लाखांचा खर्च येणार आहे. मात्र आर्थिक परिस्थतीमुळे तिच्या कुटुंबीयांना एवढी रक्कम शक्य नसल्याने सामाजिक संघटनांच्या पुढाकारातून रक्कम उभारली जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून वरोरा येथील गोंडे परिवाराच्या लग्न समारंभात मदत स्टॉल लावून मदत गोळा करण्यात आली. यातून गोंडे परिवाराने समाजासमोर नवा आदर्श उभा केला आहे.विवाह संस्कार हा मानवी जीवनातील अतिशय महत्त्वाचा क्षण आहे. आजच्या स्पर्धामय युगात या समारंभात लाखो रुपये खर्ची घालताना कोणताही विचार केला जात नाही. १९ जून रोजी वरोरा येथील नारायणराव गोंडे याची कन्या सुप्रिया हिचा विवाह साध्या पद्धतीने पार पडला. लग्नसमारंभात येणारे सर्व आप्तेष्ट तथा मित्र परिवाराला त्यांनी आवाहन केले की, माझ्या कन्येच्या लग्नात येवून आपण भेटवस्तू दिली आहे. पण आमच्या वरोरा शहरातील हनुमान वॉर्ड येथील माहेर असणाऱ्या निशा मैती या लेकीला बोनम्यारो हा दुर्धर आजार जडला आहे. तिच्या शस्त्रक्रियेकरिता १० लाख रुपये खर्च येणार आहे. तिला उपचाराकरिता एक हाथ मदतीचा आयोजन समिती व छावा ग्रुप शहरामध्ये मदत मागत आहे. आपण माझ्या मुलीला भेटवस्तू दिली त्याचप्रमाणे निशा मैती या वरोऱ्याच्या लेकीलाही उपचाराकरिता मदत करा असे आवाहन केले होते. त्यामुळे लग्न समारंभात आलेल्या आप्तेष्ठ व मित्र परिवाराने जमेल तेवढी मदत केली. हा उपक्रम तेवढ्यावरच न थांबता वडिलाची निशाबद्दल असणारी संवेदना लक्षात घेत नववधू सुप्रिया हिने पतीला विश्वासात घेऊन ओवाळणीला आलेले पैसे निशाच्या उपचाराकरिता दिले. त्यामुळे गोंडे कुटुंबीयाचे सर्वत्र कौतुक होत असून इतरांनीही मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्याकडून मिळणार मदतनिशाच्या उपचाराकरिता मदतीचे आवाहन करण्याचे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम प्रकाशित केले होते. ‘लोकमत’ने यावर वारंवार पाठपुरावा करून बातम्या प्रकाशित केल्या. बातमीची कात्रणे सोशल मिडीयावर पसरली. यानंतर याची दखल इतर माध्यमांनी घेतली. यावरून मुख्यमंत्री यांचे स्वीय सहायकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून निशाला मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.