शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

धान पिकावरील विविध रोगाने शेतकरी हवालदिल

By admin | Updated: October 22, 2015 00:48 IST

यावर्षी पावसाने दगा दिल्यावरही शेतकऱ्यांनी कशीबशी रोवणी केली. एवढे करून हातामध्ये काहीतरी येणार असल्याची ...

निसर्गाचा लहरीपणा भोवला : महागड्या औषधांचा खर्च व्यर्थपोंभुर्णा : यावर्षी पावसाने दगा दिल्यावरही शेतकऱ्यांनी कशीबशी रोवणी केली. एवढे करून हातामध्ये काहीतरी येणार असल्याची आशा बाळगून असतानाच धान पिकावर अचानक विविध रोगाचे आक्रमण झाल्याने परिसरातील शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. निसर्गाने पुन्हा शेतकऱ्यांना झोडपून काढले असून डोळ्यासमोर धानपिक खराब होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहे.पोंभुर्णा तालुक्यामध्ये शेती हाच मुख्य व्यवसाय असून मोठ्या प्रमाणात शेतकरी आजही पारंपरिक व्यवसायावर निर्भर आहेत. यंदा मात्र पावसाने चांगलीच खेळी केली. तरी पण कसेबसे शेतकऱ्यांनी घाम गाळून रोवणी करून धानाचे पीक हातात येणार असल्याचे स्वप्न बघत होते. परंतु अचानक धानपिकावर कडपा, कडाकरपा, पांढरा रोग, मावा, तुडतुडा व इतर विविध रोगांनी आक्रमण केले असल्याने आता धानपीक निघूनही शेतकऱ्यांना हाती काहीच लागणार नसल्याची स्थिती परिसरामध्ये निर्माण झाली आहे.रोवणी केलेल्या पिकाला रोगराईपासून बचाव करण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या कीटकनाशक औषधीचा वापर करीत आहे. त्यासाठी खाजगी दुकानातून औषधी विकत घेताना महागड्या औषधांचा आर्थिक भुर्दंडसुद्धा सोसावा लागत आहे. एवढे करून धानपिकावरील रोग पाहिजे त्या प्रमाणात नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी हताश झाला आहे.विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे सिंचनाची सोय नसल्याने वायसर नावाच्या मध्यम प्रतिच्या धानाची लागवड केली असून या धानपिकास शेवटच्या एका पाण्याची गरज असतानाच निसर्गाने दगा दिला. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहीर किंवा शेततलावाची सोय आहे त्यांचे धानपीक काही प्रमाणात तग धरुन आहेत. तर ज्यांचेकडे पाण्याची सोय नाही अशा शेतकऱ्यांचे धानपीक सुकून त्याचे तणसात रूपांतर होत आहे. दरवर्षी कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना तालुक्यातील शेतकरी अनेक वर्षापासून करीत आहे. जगाचे पोट भरत असताना मात्र त्यालाच स्वत:चे दोन वेळचे जेवण कठीण होत आहे, अशा परिस्थितीमध्ये शेती करणे परवडणारे राहिलेले नाही. मात्र वडिलोपार्जित पारंपरिक व्यवसाय असल्याने आणि दुसरे कुठले साधन नसल्याने त्यांना या व्यवसायावर अवलंबून राहावे लागत आहे आणि सततच्या नापिकीमुळे शेतकरी कर्जाच्या खाईत कोसळला आहे. त्यामुळे तालुका स्तरावरील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात पाहणी करून आर्थिक शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)