शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

कुड्याच्या फूलातून त्यांनी शोधला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:00 IST

विदर्भात झुडपी जंगल मोठ्या प्रमाणावर आहे. या जंगलात कुडा वनस्पतीला पोषण वातावरण आहे. साधारणत: ५ फुटांपासून २० फुटांपर्यंत या झाडांची वाढ होत असून उन्हाळ्याच्या प्रारंभापासून या झाडांना फुले येतात. नागभीड नगर परिषदेत समावेश असलेल्या नवखळा या गावालगत जंगल आहे. त्यामुळे येथील काही नागरिकांनी कुड्याच्या फुलांनाच आपले उदरनावार्हाचे साधन केले आहे.

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : रानमेव्यात गणना होणारे कुड्याचे फूल सध्या मजुरांच्या रोजगाराचे साधन बनले आहे. नागभीडलगतच्या नवखळा येथील ५० च्या वर नागरिक आपला उदरनिर्वाह या फुल विक्रीतून करीत आहेत. उन्हाळ्यात ग्रामीण भागात कुड्याच्या फुलांपासून बनविलेल्या भाजीला अनेकांची पसंती असते.विदर्भात झुडपी जंगल मोठ्या प्रमाणावर आहे. या जंगलात कुडा वनस्पतीला पोषण वातावरण आहे. साधारणत: ५ फुटांपासून २० फुटांपर्यंत या झाडांची वाढ होत असून उन्हाळ्याच्या प्रारंभापासून या झाडांना फुले येतात. नागभीड नगर परिषदेत समावेश असलेल्या नवखळा या गावालगत जंगल आहे. त्यामुळे येथील काही नागरिकांनी कुड्याच्या फुलांनाच आपले उदरनावार्हाचे साधन केले आहे. अगदी पहाटेच हे नागरिक जंगलाच्या दिशेने निघतात. उन्ह होईपर्यंत म्हणजेच, दुपारी १२ वाजेपर्यंत ते या फुलांची तोडणी करतात. त्यानंतर दुपारनंतर नागभीड शहरात ही फुले विक्रीसाठी आणल्या जाते. नवखळा येथील किमान ५० जण सदर फल विक्रीचे काम करतात. यावर्षी कोरोनामुळे लाँकडाऊन करण्यात आले. त्यामुळे या विक्रेत्यांवरही मर्यादा आल्या आहेत. दरवर्षी हा व्यवसाय करणारे काहीजण मूल, सिंदेवाही, ब्रम्हपुरी येथील बाजारांमध्ये जाऊन फूलविक्री करीत होते. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दळणवळणाची साधने बंद असल्याने त्यांना बाहेर जाता येत नाही. सर्व फुले नागभीड येथेच विकावी लागत आहेत. परिणामी विक्रेत्यांची संख्या जास्त झाल्याने दरवर्षीच्या तुलनेत त्यांची निम्मीच कमाई होत आहे.यावर्षी अधूनमधून पाऊस पडत असल्याने कुड्याच्या झाडांना फुले चांगली येत आहेत व जून महिन्याच्या शेवटपर्यंत ही फुले येत राहतील,असा अंदाज या नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.इतर गावातही फूलविक्रीतालुक्याच्या जंगलव्याप्त प्रत्येक गावातील किमान पाच-दहा जण कुड्याच्या झाडांची दोन महिने फूलविक्री करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत.पोळ्याला शेंगांचे जेवणपोळा हा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण आहे. शेतकऱ्यांचे दैवत असलेल्या बैलांची या दिवशी पुजा केली जाते. या दिवशी बैलांच्या जेवणात कुड्याच्या शेंगांच्या भाजीचा वा पानांपासून बनविलेल्या पत्रावळीचा समावेश असतो.