शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातधुवा अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:01 IST

गोवरी येथेही तालुका प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत पान टपरी, खर्रा दुकाने, व्यावसायिकांना नोटीस देऊन दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्वांनी नियम पाळत दुकान बंद ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर गोवरी ग्रामपंचायतीच्या वतीने मंगळवारपासून हात धुवा अभियान राबविण्यात आले.

ठळक मुद्देगोवरी ग्रामपंचायतीचा उपक्रम : अनेक नागरिकांनी घेतला सहभाह

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कोरोना व्हायरसची बाधा नागरिकांना होऊ नये यासाठी गोवरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पौर्णिमा उरकूडे यांच्या कल्पनेतून नागरिकांसाठी हात धुवा अभियान सुरू करण्यात आले आहे. कोरोना रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने गर्दीच्या ठिकाणी असलेल्या स्थळांवर बंदी घातली आहे. गोवरी येथेही तालुका प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत पान टपरी, खर्रा दुकाने, व्यावसायिकांना नोटीस देऊन दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्वांनी नियम पाळत दुकान बंद ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर गोवरी ग्रामपंचायतीच्या वतीने मंगळवारपासून हात धुवा अभियान राबविण्यात आले. यावेळी सरपंच पौर्णिमा उरकूडे, ग्राम विस्तार अधिकारी संजय तूरारे, अविनाश उरकूडे, सतीश पाचभाई, मारोती बावीस्कर, रमेश गाजुलवार, चेतन बोभाटे, प्रकाश काळे, भूषण जुनघरी, केतन बोभाटे, साईनाथ लांडे, अजय जुनघरी, अमय ठेंगणे, निलेश कोल्हे, आकाश गिरी, गोरघाटे, निखाडे, उपस्थित होते.ृमराईपाटण येथील यात्रा बंदजिवती : तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या मराई पाटण येथे गंगा मातेची यात्रा सुरू होती. याठिकाणी विविध राज्यातील व जिल्ह्यातील लाखोंच्या संख्येने भाविक मोठ्या श्रध्देने दर्शनासाठी येतात. मात्र यावळी कोरोनाच्या भितीमुळे ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. यासंदर्भात तहसिलदारांनी संबंधितांची बैठक घेऊन यात्रा बंद करण्याचे निर्देश दिले आहे.महिनाभर चालणारी यात्रा १६ मार्चला बंद करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिवतीचे तहसिलदार बेडसे पाटील यांनी ग्राम पंचायत, देवस्थान कमिटी, व्यापारी, तलाठी व उप पोलीस स्टेशन टेकामांडवाचे ठाणेदार यांच्या उपस्थिती बैठक घेऊन यात्रा बंद करण्यात संदर्भात माहिती दिली.जगभरात पसरलेला ‘कोरोना’ चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून तालुक्यातील मराईपाटण यात्रा रद्द करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.बल्लारपूर नगर परिषदेकडून प्रतिबंधात्मक उपायबल्लारपूर : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी बल्लारपूर नगर परिषदेने प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरु केली आहे. या अंतर्गत तक्रारी वा सूचना नागरिकांकडून मागविल्या जात आहे. नगर परिषदेतील त्या-त्या विभाग प्रमुखांच्या भ्रमणध्वनीवरुन नागरिकांनी सुचना घ्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. तद्वतच, कोरोना विषाणू संसर्गाला घाबरु नका, सावध राहा, काळजी घेऊ, करोनाला पळवून लावू, अशा घोषवाक्याअंतर्गत कोणकोणती दक्षता घेणे गरजेचे अांहे. याची माहिती नगर परिषदेकडून नागरिकांना देण्यात येत आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करीत ताप, खोकला वा पळसे असल्यास डॉक्टरांना लवकर दाखविण्याची विनंती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्पिता वावरकर यांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस