मुधोली येथे एक हात मदतीचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:20 IST2021-06-17T04:20:04+5:302021-06-17T04:20:04+5:30

सर्वप्रथम दि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ‘शेतकरी कल्याण निधी’ या योजनेअंतर्गत बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत यांच्या पुढाकाराने व ...

A hands-on initiative at Mudholi | मुधोली येथे एक हात मदतीचा उपक्रम

मुधोली येथे एक हात मदतीचा उपक्रम

सर्वप्रथम दि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ‘शेतकरी कल्याण निधी’ या योजनेअंतर्गत बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत यांच्या पुढाकाराने व संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार रवींद्र शिंदे यांच्या माध्यमातून बुधवारी भद्रावती तालुक्यातील मुधोली येथील सर्पदंशाने व वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या वारसदारांना आर्थिक सहकार्य देण्यात आले. त्यानंतर शिंदे यांच्या स्वनिधीतूनही मृतांच्या वारसांना सानुग्रह आर्थिक मदत करण्यात आली. मुधोली येथील चैतन्य बबन जीवतोडे या युवकाचा सर्पदंशाने, भारत रामाजी बावणे यांचा वाघाच्या हल्ल्यात व प्रकाश श्रीहरी घरत यांचा कोरोनाबाधित होऊन मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना ही मदत देण्यात आली.

===Photopath===

160621\1551-img-20210616-wa0055.jpg

===Caption===

भद्रावती तालुक्यातील मुधोली येथे 'एक हात मदतीचा उपक्रम

Web Title: A hands-on initiative at Mudholi