शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

दुकान गाळ्यांसाठी मनपा आयुक्तांना साकडे

By admin | Updated: September 9, 2016 00:52 IST

स्थानिक नेहरु मार्केट सराई वार्ड येथे तत्कालीन चंद्रपूर नगर परिषदेने बांधलेले मार्केट गाळे जीर्णावस्थेत असून या

चंद्रपुरातील नेहरू मार्केट : पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणीचंद्रपूर : स्थानिक नेहरु मार्केट सराई वार्ड येथे तत्कालीन चंद्रपूर नगर परिषदेने बांधलेले मार्केट गाळे जीर्णावस्थेत असून या मार्केटला ३० ते ३२ वर्षे झाले आहेत. या मार्केट मध्ये वर्तमान चंद्रपूर महानगरपालिकातर्फे नवीन गाळे बांधकाम करायचे असल्याने येथील दुकानदारांना दुकाने खाली करण्याचे नोटीस बजावण्यात आले आहे. यावर दुकानदारांनी आक्षेप घेवून दुकानांसाठी पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी मनपा आयुक्तांना निवेदनातून केली आहे. येथील गाळे ८ बाय ६ चौ. फुटाचे गाळे फुटपाथवरील दुकाने हटवून १९८४- ८५ ला अनामत रक्कम न घेता कमी भाड्यात देण्यात आले होते. त्यानंतर काही वर्षानंतरच हे मार्केट फेल ठरले व येथे १२० दुकानामधून फक्त ४० दुकाने सध्या सुरू आहेत. ज्यांना ही दुकाने मिळालीत त्यांनी, तर येथे दुकान सुद्धा टाकले नाही. येथे बेरोजगार युवक लहान-लहान व्यवसाय करीत आहेत. पानठेला, सायकल स्टोअर्स, टेलर, पेंटर, स्प्रे सेंटर, सलून, झेरॉक्स, रबर स्टॅम्प, फोटो शॉप असे लहान व्यापारी येथे असून यांना दुकान हटविण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्याने पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नेहरू मार्केट दुकानदार असोसिएशनतर्फे उपायुक्त इंगोले यांना निवेदन दिले व चर्चा केली. आर्किटेक्सशी चर्चा करून सध्या बाजुचे गोडावून तोडून पहिल्यांदा तेथे गाळे बांधून सध्या येथे दुकान चालविणाऱ्यांना दुकाने दिल्यानंतरच दुकाने खाली करून तोडण्यात येईल, असे आश्वासन उपआयुक्तांनी दिले. निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष अ. खालीक, सचिव प्रदीप नालमवार, सदस्य रकीब शेख, वासुदेव कडवे, मारोती ठाकरे, अजय सुत्रावे, सैय्यद रईस, बाबा खान, अ. रज्जाक अजीम शेख आदी उपस्थित होते. जीर्ण गाळे पाडण्याआधी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिल्यास अनेक व्यवसायिकांना सोयीचे होणार आहे. यासाठी पालिकेने पुढाकार घेणे गरजेचे आहे. (स्थानिक प्रतिनिधी)