शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच वर्षीय शिशिरने मोडला रेकॉर्ड

By admin | Updated: December 30, 2016 01:31 IST

जिल्ह्यात क्रीडा संस्कृतीची पायमुळं खोलवर रुजली जावी, यासाठी मागील वर्षीही प्रभावी अंमलबजावणी शासनाकडून वा प्रशासनाकडून करण्यात आली नाही.

चंद्रपूर : जिल्ह्यात क्रीडा संस्कृतीची पायमुळं खोलवर रुजली जावी, यासाठी मागील वर्षीही प्रभावी अंमलबजावणी शासनाकडून वा प्रशासनाकडून करण्यात आली नाही. त्यामुळे मागील वर्षी क्रीडा क्षेत्रात जिल्ह्यात फारसा ठसा उमटू शकला नाही. मात्र साडेपाच वर्षीय शिशिर सुभाष कामडी या बालकाने स्केटींगमध्ये नवा विक्रमाची नोंद केली. त्याने इंडिया बुक आॅफ रेकॉर्डचाच आजवरचा रेकॉर्ड मोडीत काढला. क्रीडा क्षेत्रात जिल्ह्यासाठी ही भुषणावह बाब ठरली. क्रीडा क्षेत्रातील ही मोठी झेप सोडली तर उर्वरित वर्षभर तालुका, जिल्हा व विभागीय व राज्यस्तरवरील क्रीडा स्पर्धा होत राहिल्या. २ जानेवारीला सन्मित्र क्रीडा मंडळ व चंद्रपूर बॉस्केटबाल असोसिएशनच्या वतीने ब्रह्मपुरी येथे राज्यस्तरीय बॉस्केटबाल स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात नांदेडने नागपूरच्या चमूवर एका गोलने मात केली होती. त्यानंतर नेहमीप्रमाणे यंदाही ६ फेब्रुवारीला नागपूर विभागीय महसूल क्रीडा स्पर्धाचे जिल्हा क्रीडा संकुलाचे आयोजन करण्यात आले होते. यात नागपूर विभागातील संपूर्ण टिम सहभागी झाल्या होत्या. भद्रावती नगरपालिकेच्या वतीने १२ ते १४ मार्च यादरम्यान नागपूर विभाग नगराध्यक्ष चषक व राज्यस्तरीय बॉक्सींग स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेने सहभागी स्पर्धकांनी उत्कृष्ट खेळांचे प्रदर्शन करून भद्रावतीकरांना रिझविले होते. ५ एप्रिल रोजी आयुधनिर्माणी चांदा येथे रात्रकालीन क्रिकेट स्पर्धा पार पडल्या होत्या. क्रिकेटमधील होतकरू खेळाडूंसाठी मागील वर्षी चांगली पर्वणी चालून आली होती. १४ ते १९ वयोगटातील मुलांसाठी क्रिकेट प्रशिक्षण निवड चाचणी २९ एप्रिलला घेण्यात आली. यातून चांगले क्रिकेटपटू निवडण्यात आले. पुढे त्यांना विभागीय व राज्यस्तरावर खेळविण्यात येणार होते. २० मे रोजी बल्लारपूर येथे आयोजित कराटे स्पर्धा चांगलीच चर्चेची राहिली. या आॅल इंडिया ओपन कराटे कुंग फू चॅम्पीयनशिपच्या नागपूर येथील किर्ती राऊत आणि पुरुषामध्ये वर्धा येथील सोयल बेग हे विजयी ठरले. २५ मे रोजी अकोला येथे विदर्भस्तरीय रोलर स्केटींग स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत चंद्रपुरातील खेळाडूंनी तब्बल ३५ पदके प्राप्त केली. खेळाडूंचे हे यश मागील वर्षीचा लक्षणीय ठेवा ठरला. २ आॅगस्टला क्रीडा व युवक सेवा संचनालय, पुणे अंतर्गत शालेय क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली. जिल्हा क्रीडा संकुलामध्ये पार पडली. २२ आॅगस्टला चंद्रपुरातील शिशिर सुभाष कामडी या साडेपाच वर्षांच्या मुलाने इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये स्केटींग प्रकारात नवा विक्रम नोंदविला. ८ सप्टेंबरला जिल्हास्तरीय व्हालीबाल स्पर्धा पार पडली. यात बल्लारपूर नगरपालिकेच्या गांधी विद्यालयाची चमू उपविजेती ठरली. येथील लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील मुलींच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघाने राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. मॅराथान स्पर्धा ठरली लक्षवेधक आनंदवनातील ज्येष्ठ समाजसेवक कर्मयोगी स्व. बाबा आमटे यांच्या स्मृतीनिमित्त १० फेब्रुवारीला वरोरा येथे ‘भारत जोडो मॅराथान स्पर्धा’ घेण्यात आली होती. विशेष म्हणजे, या स्पर्धेत प्रथमच अपंग, अंध, मुकबधिर असे एकूण एक हजार ७२ स्पर्धक सहभागी झाले होते. ही मॅराथान स्पर्धा मागील वर्षीची लक्षवेधक स्पर्धा ठरली. संजिवनी कावळे राष्ट्रीय क्रिकेट संघात क्रिकेटमधील एकापेक्षा एक सरस खेळाडू जिल्ह्यात आहेत. मात्र त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. मागील वर्षीचा आढावा घेतला असता याचीच प्रचिती येते. भद्रावती येथील लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी संजिवनी कावळे हिची राष्ट्रीय क्रिकेट संघात स्थान मिळविले. ही बाब जिल्ह्यासाठी गौरवाची आहे.