शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

मुलांचे पालक व शिक्षकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा

By admin | Updated: December 25, 2015 00:29 IST

मतिमंद मुलांचे पालक व मुलांच्या शिक्षकांसाठी मंगळवारी स्थानिक आयएमए हॉलमध्ये एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

मतिमंदांसाठी आयोजन : आयएमए व रोटरी क्लबचा उपक्रमचंद्रपूर : मतिमंद मुलांचे पालक व मुलांच्या शिक्षकांसाठी मंगळवारी स्थानिक आयएमए हॉलमध्ये एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मतिमंद मुलांचे शिकणे, सुधारणे, विकसित होणे, समजणे व स्मरणात ठेवणे अशा विविध प्रकारच्या बुद्धीमत्तेचा ऱ्हास तसेच मतिमंदाच्या या पाच अवस्थांपैकी प्रत्येक अवस्थेत कला कौशल्य निर्माण करुन त्यांची बौद्धीक क्षमता वाढविणे व त्या मुलांमध्ये आत्मविश्वास जागविणे या उद्देशाने रोटे. मनिषा पडगिलवार व डॉ. किरण देशपांडे यांच्या संकल्पनेतून मतिमंद मुलांच्या पालकांसाठी व शिक्षकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन रोटरी क्लब आॅफ चंद्रपूर व इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचे उद्घाटन रोटरी क्लब आॅफ चंद्रपूरच्या अध्यक्षा अनुपा भाम्बरी व आयएमए चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. अशोक भुक्ते यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून नाशिक येथील घरकूल परिवार संस्था संचालित मतिमंद मुलींच्या शाळेच्या प्राचार्य श्रीमती विद्या फडके उपस्थित होत्या. मुलांचे संगोपन व संवर्धन हे पालकांसाठी व शिक्षकांसाठी खुप मोठे आव्हान असते. अशा मुलांच्या गरजा समजावून घेणे व त्यांचा विकास करण्यासाठी विद्या फडके खास नाशिकहून चंद्रपूरला आल्या होत्या. या कार्यशाळेत पालक व शिक्षकांशी त्यांनी थेट संवाद साधला. विशेष मुलांना कोणत्या प्रकारचे शिक्षण द्यायचे, त्यांचा सांभाळ कशा पद्धतीने करायचा याबद्दल त्यांनी पालक व शिक्षकांना मार्गदर्शन केले. स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. नसरीन मवानी यांनी विशेष मूल बालपणातून किशोरवयामध्ये प्रवेश करते तेव्हा कशा पद्धतीने काळजी घ्यायची याची माहिती दिली. यावेळी घरकूल संस्थेच्या विशेष मुली आदिती जाधव, सोनी जाधव, रोशन सावंत यांनी समूह नृत्य सादर केले, तर योजना गोखले, रेणुका देशपांडे यांनी कविता तर श्रृती देशमुख हिने गीत सादर केले. या कार्यक्रमाचे संचालन स्मिता जीवतोडे यांनी केले. (प्रतिनिधी)