बल्लारपूर पोलिसांचे ज्येष्ठांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:31 IST2021-08-20T04:31:45+5:302021-08-20T04:31:45+5:30

बल्लारपूर : ज्येष्ठ नागरिकांचा त्यांच्या कुटुंबीयांकडून होत असलेला छळ, मुलांकडून होणारी मारहाण यावर आळा बसावा व त्यांना कायद्याची ...

Guidance to seniors of Ballarpur police | बल्लारपूर पोलिसांचे ज्येष्ठांना मार्गदर्शन

बल्लारपूर पोलिसांचे ज्येष्ठांना मार्गदर्शन

बल्लारपूर : ज्येष्ठ नागरिकांचा त्यांच्या कुटुंबीयांकडून होत असलेला छळ, मुलांकडून होणारी मारहाण यावर आळा बसावा व त्यांना कायद्याची माहिती द्यावी, यासाठी बल्लारपूर पोलीस ठाण्यातर्फे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी ठाण्यात बैठकीचे आयोजन करून मार्गदर्शन केले. उपस्थित ज्येष्ठांना ओळखपत्र वितरण करण्यात आले.

यावेळी आयोजित बैठकीत आधार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारोतराव मोंढे तसेच विनायक गंधेवार, दत्तू झाडे, अनिल लुथडे, गुलाब मुरकुटे, रामधन सोमाणी, अशोक गुप्ता यांनी विचारलेल्या प्रश्नांची ठाणेदार उमेश पाटील यांनी उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले. आपले एटीएम दुसऱ्याला देऊ नये. पैसे काढताना घरचा व्यक्ती सोबत ठेवावी. ओळखपत्र सोबत बाळगावे, असे सांगितले. यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र वाटप करण्यात आले, अशी माहिती पोलीस ठाण्याचे रवी चेरकुलवार यांनी दिली.

190821\img-20210816-wa0236.jpg

ज्येष्ठांना मार्गदर्शन करताना ठाणेदार उमेश पाटील.

Web Title: Guidance to seniors of Ballarpur police