रूग्णवाढीचा आलेख घसरतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 05:00 AM2020-09-27T05:00:00+5:302020-09-27T05:00:32+5:30

जुलै, ऑगस्टमध्ये चाचण्या वाढविण्यात आल्या. त्यामुळे रूग्णांची संख्याही वाढली. जिल्हा आरोग्य प्रशासनाने तपासणी, निदान व लवकर उपचार या त्रिसुत्रीचा प्रभावी वापर केल्याने रूग्णवाढीचा आलेख केवळ या आठवड्यात तरी खाली येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. १८ सप्टेंबर ते २४ डिसेंबर २०२० या सात दिवसात नवे रूग्ण दीडशे तर बरे होणाऱ्यांच्या प्रमाणातही मोठे अंतर नाही. गत आठवड्यात हीच संख्या मोठी होती. त्यामुळे हजारांवर पोहोचल्याने चिंता व्यक्त केली जात होती.

The growth graph is declining | रूग्णवाढीचा आलेख घसरतोय

रूग्णवाढीचा आलेख घसरतोय

Next
ठळक मुद्देदिलासादायक । कोरोना बाधितांचे मृत्यू रोखणे आरोग्य प्रशासनासमोर आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली. त्यामुळे आठवडाभरात संसर्गाचा आलेख घसरत असल्याचे दिलासादायक चित्र पुढे आले आहे. सात दिवसात १७३३ नवे रूग्ण आढळले. तर १०९७ व्यक्ती उपचारानंतर बरे झाले आहेत. १८ सप्टेंबरला सर्वाधिक ३०३ रूग्णांची नोंद झाली आहे. मात्र, कोराना बाधित गंभीर रूग्णांची संख्या दरदिवशी दोन ते तीन असल्याने नागरिकांमध्ये दहशत कायम असल्याचे दिसून येत आहे.
जुलै, ऑगस्टमध्ये चाचण्या वाढविण्यात आल्या. त्यामुळे रूग्णांची संख्याही वाढली. जिल्हा आरोग्य प्रशासनाने तपासणी, निदान व लवकर उपचार या त्रिसुत्रीचा प्रभावी वापर केल्याने रूग्णवाढीचा आलेख केवळ या आठवड्यात तरी खाली येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. १८ सप्टेंबर ते २४ डिसेंबर २०२० या सात दिवसात नवे रूग्ण दीडशे तर बरे होणाऱ्यांच्या प्रमाणातही मोठे अंतर नाही. गत आठवड्यात हीच संख्या मोठी होती. त्यामुळे हजारांवर पोहोचल्याने चिंता व्यक्त केली जात होती.
आरोग्य प्रशासनाने याच कालावधीत चाचण्यांची संख्या वाढवली आहे. नागरिकांनी स्वत:हून तपासणीसाठी केंद्रात यावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याने चंद्रपूर शहरात तरी रामनगर व बाबुपेठ येथील चाचणी केंद्रात नागरिकांची संख्या वाढली. जुलै व ऑगस्टमध्ये संशयित रूग्ण शोध मोही राबविण्यात आली. लवकर तपासणी, लवकर निदान आणि लवकर उपचार ही त्रिसूत्रीचा वापर करण्यात आला. राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात माझे कुटुंंबमाझी जबाबदारी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे चाचण्यांचे प्रमाण वाढण्याचा अंदाज जिल्हा आरोग्य प्रशासनाने वर्तविला आहे.

कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ
मागील सात दिवसात रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झाली आहे. तालुका कोविड केअर सेंटर यासाठी उपयुक्त ठरले आहेत. या सेंटरमध्ये आरोग्य सुविधा वाढविल्यास पुन्हा चित्र बदलू शकेल, असा प्रशासनाचा दावा आहे.
कोरोनामुक्तीसाठी ट्रीपल टी ही त्रिसूत्री वापरल्या जात आहे. मागील आठवड्यात कोरोना रूग्ण वाढीचा डबलिंग रेट १० होता. हा संसर्ग रेट १० पेक्षा जास्त असल्यास सप्टेंबर अखेरपर्यंत रूग्णांची संख्या २० हजार होण्याचा अंदाज आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी वर्तविला होता. शनिवारपर्यंत बाधितांची संख्या ९ हजार ३५० झाली आहे. कोरोनामुक्तीचा वेग असाच राहिल्यास दिलासादायक ठरू शकते.

Web Title: The growth graph is declining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.