शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक लोककलावंतांना शासनाने मानधन द्यावे

By admin | Updated: February 9, 2016 00:54 IST

पूर्वीच्या काळी मनोरंजनाचे साधन म्हणजे लोककला होती. परंतु आधुनिक मनोरंजनापुढे पूर्वीच्या लोककलाकारांच्या कला लुप्त होत आहे.

सभापती वैशाली येंसाबरे : लोककलाकार मेळावाचिमूर: पूर्वीच्या काळी मनोरंजनाचे साधन म्हणजे लोककला होती. परंतु आधुनिक मनोरंजनापुढे पूर्वीच्या लोककलाकारांच्या कला लुप्त होत आहे. शासनस्तरावर लोककलाकरांना मानधन मिळत असले तरी शेकडो कलाकार अजूनही वंचित राहत आहे. लोककलाकारांनी एकत्र येऊन कलेचा वारसा जपून ठेवावा. शासनाकडून लोककलाकारांना मानधन देण्यात यावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन पंचायत समिती सभापती वैशाली येंसाबरे यांनी दिले.शिवापूर बंदर येथे जिल्हास्तरीय लोककलाकारांचा मेळाव्यात सभापती वैशाली येंसाबरे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पुंडलिक मत्ते, सरपंच बंडू ढोक, श्रीकृष्ण नन्नावरे, किरण राऊत, शाहीर परिषदेचे विदर्भ अध्यक्ष भिवगडे, जि.प. सदस्य गीता लिंगायत, डॉ. महेश जोगी (नागपूर), यशवंत घुमे, रिठे आदी उपस्थित होते.या मेळाव्यात जिल्ह्यातून आलेल्या लोककलाकारांची नोंदणी करुन यादी शासनाकडे पाठविणार असल्याचे सांगितले. खडीगंमत, पोवाडा, दंडार, भजन, तमाशा, डहाका, भारुड आदी लोककला कलाकारांनी सादर केल्या. या मेळाव्याचे प्रास्ताविक शाहीर परिषद तालुका अध्यक्ष किरण राऊत यांनी केले. जिल्हास्तरीय लोककला मेळावा यशस्वी करण्यासाठी श्रीकृष्ण नन्नावरे, नाना बारेकर, श्रीरंग गायकवाड, बंडू तराळे, ईश्वर बावणे, रामभाऊ कोडापे, दिलीप दडमल, अनिल सोनवाने, मोतीराम कामडी, नीलेश कामडी, छाया गोयकवाड, लता तराळे, पार्वता नन्नावरे, राधा सोनटक्के, सिता दडमल, गिरीजा कामडी आदींनी परिश्रम घेतले. या मेळाव्यास लोककलाकारासह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शाहीर परिषद तालुका अध्यक्ष किरण राऊत हे लोक कलाकारांच्या हितासाठी समता मेळाव्याच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)