शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी जमिनीवर सरकारी बांधकाम

By admin | Updated: May 29, 2015 01:44 IST

सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही येथील तलाठी साजा १९ मधील खैरी चक गटातील भूमापन क्रमांक २७० मधील वहीवाट असलेली जागा मारोती मोतीराम पोहनकर यांच्या मालकीची असताना ....

गुंजेवाही : सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही येथील तलाठी साजा १९ मधील खैरी चक गटातील भूमापन क्रमांक २७० मधील वहीवाट असलेली जागा मारोती मोतीराम पोहनकर यांच्या मालकीची असताना तत्कालीन तहसीलदारांनी वारसदारांशी पत्रव्यवहार न करता तलाठ्यांच्या सांगण्यावरून वाटपात मिळालेली व वहीवाट असलेली जागा बेदखल केली. यामुळे संबंधित वारसदारावर उपासमारीची वेळ आली आहे. खाजगी जोत असलेल्या गट नं. २७० जागेची चौकशी करून संबंधीतांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार उन्मुलन संघटनेनी केली आहे.सदर प्रकरण खैरी चक गटात येत असून या जागेवर खरीप धानाचे पिक घेतले जात आहे. ही जागा २.४३ हेक्टर आर. असून त्या जागेवर सन २०१२-१३ मध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभाग चंद्रपूरच्या मार्फतीने पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्याच्या निवासस्थानाच्या बांधकामाची मंजुरी देण्यात आली. परंतु कोणतेही शासकीय बांधकाम करताना त्या जागेची पाहणी केली जाते. ती जागा खासगी की सरकारी याचे अवलोकन करण्यात येते आणि नंतर बांधकाम केले जाते. मात्र कंत्राटदार व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याच प्रकारची परवानगी न घेता परस्पर बांधकामाला सुरूवात केली. याबाबत तत्कालीन तलाठी यांना माहिती होताच त्या बांधकामावर आक्षेप घेवून सिंदेवाही येथील तहसीलदारांना २० डिसेंबर २०१२ ला प्रतिवेदन दिले. तेव्हा २६ डिसेंबर २०१२ ला तहसीलदारांनी उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद उपविभाग ब्रह्मपुरी यांना बांधकाम केलेल्या जागेसंबंधी प्रतिवेदन दिले. तेव्हा लगेच जि.प. बांधकाम उपविभाग ब्रह्मपुरी यांनी ४ जानेवारी २०१३ ला तहसिलदारांना पत्र देवून गट नं. २७० मध्ये बांधकाम होत असल्याचे कळविले. तेव्हा तहसिलदार यांनी सदर बांधकाम अवैध असल्याचा ठपका ठेवल्याने काही दिवसांसाठी बांधकाम बंद ठेवण्यात आले. परंतु कंत्राटदार, बांधकाम विभागाचे अधिकारी व तहसिलदार यांनी त्या बांधकामाबाबत चर्चा करून पुढील बांधकाम करण्याची परवानगी मिळताच कामाला गती आली. या संबंधीची तक्रार अखिल भारतीय भ्रष्टाचार उन्मूलन संघटनेच्या माध्यमातून वरिष्ठ स्तरावर ३ जानेवारी २०१४ व ८ मे २०१४ ला दिल्यानंतर बांधकाम विभागात खळबळ माजली. हे प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने संबंधीत कंत्राटदार आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्कालीन तहसिलदार यांच्याशी संगनमत करून गट नं. २७० खैरी चक ही असलेली जमीन बेदखल करण्यासाठी उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. चिमूर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी ९ मे २०१४ ला आदेश पारित केला व तहसिलदार यांनी या आदेशानुसार जागा बेदखल (सरकार जमा) केली. (वार्ताहर)