शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
2
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
3
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
6
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
7
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
8
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
9
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
10
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
11
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
12
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
13
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
14
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
15
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
16
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
17
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
18
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
19
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
20
बाल्कनीतून कबुतरांना हटवण्याचा सर्वात सोपा अन् प्रभावी उपाय; समस्येतून मिळेल कायमचा तोडगा
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी विद्यार्थ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 06:00 IST

राजुरा नगरपालिकेच्या वतीने ना. विजय वडेट्टीवार व आमदार सुभाष धोटे यांचा जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राजुरा तालुका काँग्रेस कमिटी, राजुरा विधानसभा काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, किसान सेल, अल्पसंख्यक विभाग, एनएसयुआय, व्यापारी वर्ग आणि विविध संस्थांच्या वतीनेसुध्दा दोघांचाही सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : राजुरा पालिकेतर्फे नागरी सत्कार सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : महाविकास आघाडीचे सरकार जनकल्याणासाठी काम करणार आहे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी निवासी वसतिगृह, निराधार, अपंग महिलांसाठी घरे, आदिवासी विद्यार्थ्यांच्या धर्तीवर ओबीसी गरीब मुलांना सीबीएसई शाखेच्या उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, अशी व्यवस्था निर्माण करणार आहोत. राजुरा मतदार संघातील ३०० तरूणांना व्यावसायिक उद्देशाने प्रत्येकी एक लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, राजुरा नगर परिषदेचे सर्व प्रलंबित प्रश्न निकालात काढले जातील. यासाठी १० कोटी रुपये विकास निधी राज्य सरकार राजुरा नगर परिषदेला देणार असल्याचे आश्वासन असे आश्वासन राज्याचे खार जमीन विकास, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.राजुरा नगरपालिकेच्या वतीने ना. विजय वडेट्टीवार व आमदार सुभाष धोटे यांचा जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राजुरा तालुका काँग्रेस कमिटी, राजुरा विधानसभा काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, किसान सेल, अल्पसंख्यक विभाग, एनएसयुआय, व्यापारी वर्ग आणि विविध संस्थांच्या वतीनेसुध्दा दोघांचाही सत्कार करण्यात आला.याप्रसंगी आमदार सुभाष धोटे म्हणाले, पाच वर्षांत राजुरा विधानसभा क्षेत्राला अतिशय दुय्यम वागणूक मिळाली. अनेक प्रश्न ताटकळत पडले. राजुरा नगर परिषदेच्या अनेक महत्त्वपूर्ण विषयावर अडवणूक झाली. मात्र आता आपल्या सरकारच्या माध्यमातून सर्व रेंगाळलेले आणि आवश्यक नवीन विकासकामे पूर्ण व्हायला हवीत ही जनतेची मागणी आहे. अशी भुमिका मांडली.यावेळी राजुरा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष दादा पाटील लांडे, नगराध्यक्ष अरुण धोटे, प्रकाश देवतळे, हमीदभाई, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सभापती मुमताज अब्दुल जावेद, उपसभापती मंगेश गुरनुले, जि. प. सदस्य मेघा नलगे, गटनेता रमेश नळे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, मुख्याधिकारी आर्शिया जुही आदी उपस्थित होते. प्रास्ताविक नगराध्यक्ष अरुण धोटे तर संचालन व आभार प्रदर्शन विजय जांभूळकर यांनी केले.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार