शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

घुग्घुस नगर परिषदेसाठी जिल्हा परिषदेसमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:24 IST

येथील ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा मिळावा, यासाठी सोमवारी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या समोर घुग्घुस नगर परिषद स्थापना संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

एल्गार : न.प. स्थापना संघर्ष समितीलोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : येथील ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा मिळावा, यासाठी सोमवारी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या समोर घुग्घुस नगर परिषद स्थापना संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यादरम्यान जिल्हा परिषदच्या कार्यकारिणी व स्थायी समितीच्या सभेत प्रस्ताव सादर करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. धरणे आंदोलन दरम्यान जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार, जि.प.सदस्य सतिश वाजुरकर, माजी जि.प.सदस्य विनोद अहिरकर, गजानन गावंडे, अशोक नागपुरे, नंदा अलुरवार यांच्यासह अनेकांनी भेटी देऊन मागणीला समर्थन दिले. शासन तरतुदीनुसार ग्रामसभेच्या ठरावाला विशेष महत्त्व आहे. नगर परिषदेचा दर्जाप्राप्ती संबंधीचे संपूर्ण निकष १५ वर्षांपूर्वी घुग्घुस ग्रामपंचायतीने पूर्ण केले आहे. १९९९ च्या जनगणनेनुसार २५ हजार तर २००१ च्या जनगणनेनुसार २९ हजार ९४५ व २०११ नुसार ३२ हजार ७२६ एवढी घुग्घुसची लोकसंख्या आहे. लोकसंख्या वाढीचा दर ३ टक्क़े आहे. त्यानुसार सद्यस्थितीत ४५ हजारांपेक्षा अधिक येथील लोकसंख्या आहे. कोळसा खाणी, सिमेंट कारखाना, लोखंडाचा कारखाना असल्याने या उद्योगांपासून शासनाला कोट्यवधीचा महसूल मिळतो. नगर परिषदेचा दर्जा मिळावा यासाठी १५ वर्षांपासून शासनाकडे सातत्याने मागणी होत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष झाले. तत्कालीन ग्राहक संरक्षण मंत्री व वर्तमान वने, अर्थ नियोजन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घुग्घुस नगर परिषद अस्तित्वात आल्याची घोषणा एका कार्यक्रमात वर्तमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत केली होती. अंमलबजावणी झाली नाही. भाजपचीच सत्ता असल्याने या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. धरणे आंदोलनात समितीचे अध्यक्ष शामराव बोबडे, लक्ष्मण सादलावार, राजीरेड्डी प्रोद्दटुरी, जावेद सिद्दीकी, अनवर सैय्यद व पदाधिकारी, रामपाल वर्मा, सुनिल जानवे, श्रीनिवास गोसकुला, संजय भोंगळे, नागेश पथाडे, शिवसेना गणेश शेंडे, राकेश जयस्वाल, संगित बोबडे, शालू बांदुरकर, गीता बोबडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक सहभागी होते.