शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

रात्री १२ पर्यंत वाजविता येणार भोंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 05:00 IST

केंद्र शासनाच्या १० ऑगस्ट २०१७ रोजीच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण सुधारित नियम, २०१७ च्या नियम ५ उपनियम (३) व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिपणीनुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादीच्या वापराबाबत श्रोतागृहे, सभागृह, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्यात निकडीनुसार, वर्षांमध्ये १५ दिवस निश्चित करुन सकाळी ६ वाजल्यापासुन ते रात्री १२ वाजतापर्यत सुट जाहीर करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : सात उत्सवासाठी विशेष परवानगी, ध्वनिमर्यादा पाळावी लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील प्रमुख सात उत्सवादरम्यान रात्री १२ वाजतापर्यंत लाऊडस्पिकर्स वाजवण्याची परवानगी जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी दिली आहे. या परवानगीमुळे उत्साह साजरा करणाऱ्यांमध्ये काही प्रमाणात का होईना आनंद व्यक्त केला जात आहे.केंद्र शासनाच्या १० ऑगस्ट २०१७ रोजीच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण सुधारित नियम, २०१७ च्या नियम ५ उपनियम (३) व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिपणीनुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादीच्या वापराबाबत श्रोतागृहे, सभागृह, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्यात निकडीनुसार, वर्षांमध्ये १५ दिवस निश्चित करुन सकाळी ६ वाजल्यापासुन ते रात्री १२ वाजतापर्यत सुट जाहीर करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून विविध सात उत्सवादरम्यान रात्री १२ वाजतापर्यंत लाऊडस्पिकर्स वाजविण्यासाठी अनुमती दिली आहे. असे असले तरीही उत्सवादरम्यान संबंधितांना परवानगी घ्यावीच लागणार आहे.पाच दिवस अजूनही राखीव२२ ऑगस्ट २०१७ च्या शासन निर्णयाअन्वये सन २०२० करीता १५ दिवस निश्चित करण्याकरिता, ध्वनी प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस अधिक्षकांसोबत ३१ डिसेंबर २०१९ ला चर्चा करण्यात आली. यामध्ये विविध १० दिवस निश्चित करण्यात आले असून उर्वरित ५ दिवस राखीव ठेवण्यात आले आहेत. या दिवसासंदर्भात पुन्हा नव्याने आदेश निघण्याची शक्यता आहे.ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० च्या नियम ५ (३) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर श्रोतेगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी सन २०२० करिता १० दिवसांसाठी, फक्त ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजतापर्यंत परवानगी देण्याचे आदेश देण्यात आले आहे.घ्यावी लागणार परवानगीसूट दिलेल्या दिवसाकरिता सक्षम प्राधिकारकडून परवानगी घेवूनच त्यांनी ठरवून दिलेल्या अटी व शर्ती प्रमाणेच ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर करता येईल, तसेच आवारावरही निर्बंध असेल, असे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले.या उत्सवांचा राहणार समावेशशिवजयंती, ईद-ए- मिलाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रत्येकी एक दिवस, गणेश उत्सव ३ दिवस (अनंत चर्तुदशी व २ दिवस), नवरात्री उत्सव २ दिवस (अष्टमी व नवमी), धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन १ दिवस व ३१ डिसेंबरसाठी १ दिवस. ध्वनीक्षेपकाची ध्वनीवर्धक वापरासाठी वेळेत सुट देण्याबाबत इतर ०५ दिवसांचे बाबतीत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गणेश उत्सवाकरिता असलेले उर्वरित २ दिवसांचे बाबतीत सुध्दा विशेष आदेश काढण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक