२४ तासात ३५ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:12 IST2021-01-13T05:12:19+5:302021-01-13T05:12:19+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासात ३५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ३५ ...

Free 35 corona in 24 hours | २४ तासात ३५ कोरोनामुक्त

२४ तासात ३५ कोरोनामुक्त

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासात ३५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ३५ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २२ हजार ७१८ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २१ हजार ९९४ झाली आहे. सध्या ३४७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८५ हजार ८५५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी एक लाख ६१ हजार ४८ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ३७७ बाधितांचे मृत्यू झाले असून, यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३४४, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १८, यवतमाळ ११, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधित आलेल्या ३५ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील नऊ, बल्लारपूर पाच, भद्रावती पाच, सिंदेवाही एक, मूल एक, राजुरा एक, चिमूर तीन, वरोरा चार, कोरपना चार व इतर ठिकाणच्या दोन रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना आजार अद्याप गेलेला नाही. कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातून अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघताना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: Free 35 corona in 24 hours