रेती तस्करी करणारे चार ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:39 IST2020-12-14T04:39:27+5:302020-12-14T04:39:27+5:30

कोरपना तहसीलदाराची कारवाई : रेती तस्करांचे धाबे दणाणले कोरपना : पैनगंगा नदीपात्रातील परसोडा व वणोजा नदी घाटातून ...

Four tractors smuggling sand seized | रेती तस्करी करणारे चार ट्रॅक्टर जप्त

रेती तस्करी करणारे चार ट्रॅक्टर जप्त

कोरपना तहसीलदाराची कारवाई : रेती तस्करांचे धाबे दणाणले

कोरपना : पैनगंगा नदीपात्रातील परसोडा व वणोजा नदी घाटातून रेती तस्करी करणाऱे चार ट्रॅक्टर शनिवार जप्त करण्यात आले. ही कारवाई कोरपना तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

परसोडा नदी घाटातून रेती खणन करून नेत असताना ट्रॅक्टर क्र.

एम. एच. ३४ -५०३०, एमएच ३४ बी. जी. ०९२३,एम. एच. ३४ एल. ५४८५

ला मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे, तलाठी वीरेंद्र मडावी, प्रकाश कमलवार, अमोल गोसावी यांनी संयुक्तरीत्या पकडून कारवाई केली.तर रात्री आठ वाजता वनोजा नदी घाटातून रेती तस्करी करताना एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. ही कारवाई अंतरगाव बुद्रुकचे तलाठी कोसनकर, नांदगावचे तलाठी सचिन

कावळे यांनी संयुक्त रित्या केली. त्यानंतर वाहनाचा पंचनामा करून तहसील कार्यालय कोरपना येथे वाहने जमा करण्यात आली. सदर वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यास तहसील कार्यालयीन वाहन चालक कापरकर, नागोसे यांनी सहकार्य केले.

या धडक कारवाईने कोरपना तालुक्यातील रेती तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले गेले आहे.

Web Title: Four tractors smuggling sand seized