वन अकादमी देशातील दुसरी सर्वोत्तम इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 06:00 AM2020-01-18T06:00:00+5:302020-01-18T06:00:21+5:30

वन अकादमी संस्था ही वन विभागाचे वन्यजीव व्यवस्थापन, उत्पादन व वनांवर अवलंबून असणारी संस्था म्हणून काम करणार आहे. वन अकादमी संकुल परिसरात वन वणवा व नैसर्गिक आपत्ती निवारण केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे चंद्रपूर वन अकादमी आपत्ती निवारणाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून मान्यता प्राप्त ठरणार आहे. या अकादमीत दीर्घकालीन व्यावसायिक प्रशिक्षणासमवेतच विविध विकास प्रकल्पांचा पर्यावरणीय अभ्यास अहवाल तयार करुन देण्यात येणार आहे.

Forest Academy Second best building in the country | वन अकादमी देशातील दुसरी सर्वोत्तम इमारत

वन अकादमी देशातील दुसरी सर्वोत्तम इमारत

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : चंद्रपुरातील वन अकादमीची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : देशातील अत्याधुनिक अशी सर्वांगसुंदर वन अकादमी चंद्रपूरात साकारण्याच्या प्रक्रियेत आपण योगदान देऊ शकलो याचा अभिमान असून ही अकादमी देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाेत्तम इमारत आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी अर्थ, वनमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. गुरूवारी वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनीला अर्थात वनअकादमीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.
वन अकादमी संस्था ही वन विभागाचे वन्यजीव व्यवस्थापन, उत्पादन व वनांवर अवलंबून असणारी संस्था म्हणून काम करणार आहे. वन अकादमी संकुल परिसरात वन वणवा व नैसर्गिक आपत्ती निवारण केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे चंद्रपूर वन अकादमी आपत्ती निवारणाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून मान्यता प्राप्त ठरणार आहे. या अकादमीत दीर्घकालीन व्यावसायिक प्रशिक्षणासमवेतच विविध विकास प्रकल्पांचा पर्यावरणीय अभ्यास अहवाल तयार करुन देण्यात येणार आहे. पर्यावरण क्षेत्रात संस्थांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे व जनजागृतीचे उपक्रम हाती घेणे, वनखात्याची शिखर संस्था म्हणून ही अकादमी काम करणार आहे. यामध्ये तांत्रिक तसेच सेवा अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आमदार मुनगंटीवार यांच्या कल्पक नियोजनातुन साकारलेल्या या वन अकादमीमध्ये प्रबोधिनी सभोवताल संरक्षण भिंतीचे बांधकाम, प्रबोधिनी संचालकाचे निवासस्थान, प्रबोधिनी प्रेक्षागृह नुतनीकरण, प्रशासकीय इमारतीचे नुतनीकरण, प्रबोधिनी वसतिगृहाचे नुतनीकरण, संकुल बांधकाम व पायाभूत सुविधा, सजावट व फर्निचर, अग्निशमन यंत्रणा, पथदिवे व इतर विद्युतीकरणाची कामे, स्व. उत्तमराव पाटील उद्यान संरक्षण भिंत, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन व कृतीदल केंद्राच्या इमारत बांधकाम आणि प्रबोधिनी संकुलातील पाणी पुरवठा आदी कामे पूर्ण झाली. आमदार मुनगंटीवार यांनी वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची बैठक घेऊन वन अकादमीच्या कामांचा आढावा घेतला.
यावेळी अकादमीचे संचालक अशोक खडसे, खाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, कार्यकारी अभियंता भास्करवार, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, रामपाल सिंह, नगरसेवक रवि आसवानी, जयश्री जुमडे, रवि गुरनुले, विठ्ठल डुकरे, शिला चव्हाण, संदीप आवारी, वंदना तिखे, अरूण तिखे आदी उपस्थित होते.

विकासाभिमुख अधिकारी घडणार
राज्यात भाजपचे सरकार असताना तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथील वनप्रशिक्षण संस्थेचे वनअकादमीत रूपांतरण करून पायाभूत सुविधा, पदनिर्मिती, प्रशासकीय संरचना व स्वायत्तता देण्याचा निर्णय घेऊन ४ डिसेंबर २०१४ रोजी शासन निर्णय निर्गमित केला होता. आयएएस व आयएफएस झालेल्या उमेदवारांना डेहराडूून केंद्रात ज्या पद्धतीचे प्रशिक्षण दिल्या जाते त्याच सुविधा आता चंद्रपुरातही उपलब्ध झाल्या आहेत. यातून विकासाभिमुख अधिकारी घडणार आहेत.

Web Title: Forest Academy Second best building in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.