शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2016 00:57 IST

पाणी म्हणजे जीवन आहे. परंतु ते पाणी तितकेच शुद्ध असायला हवे, पाण्यामुळेच तहानलेला जीव शांत होतो.

दात झाले पिवळे : वारंवार ओरड करूनही प्रशासन ढिम्मप्रकाश काळे गोवरीपाणी म्हणजे जीवन आहे. परंतु ते पाणी तितकेच शुद्ध असायला हवे, पाण्यामुळेच तहानलेला जीव शांत होतो. मात्र चिंचोळी (खुर्द) येथील पाणीच फ्लोराईडयुक्त असल्याने गावकऱ्यांना नेहमीच कोणता ना कोणता आजार जडतो. फ्लोराईडयुक्त पाणी पिणेच नागरिकांच्या नशिबी आले असून याच पाण्यावर चिंचोलीवासीयांना आपली तहान भागवावी लागत आहे. या पाण्यामुळे नागरिकांचे दात पिवळे झाले असून आरोग्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. वारंवार ओरड करूनही प्रशासनाकडून दखलच घेतली जात नसल्याने आता दाद कुठे मागावी, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.राजुरा तालुक्यापासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेले चिंचोली (खुर्द) पूर्वीपासूनच तसे दुर्लक्षित गाव. गावाकडे जाणाऱ्या रस्त्याअभावी या गावाकडे फारसे प्रशासकीय यंत्रणेच लक्ष गेले नाही. त्या काळातच चिंचोली गावाला शिक्षणाची गंगोत्रीच मिळाल्याने हे गाव शिक्षण क्षेत्रात अधिकच प्रकाशझोतात आले. मात्र गावकऱ्यांना अपेक्षित असलेला गावाचा विकास झाला नाही. तब्बल १५ ते १६ वर्षापूर्वी गावातील जलस्त्रोत आटल्यामुळे गावाच्या मुख्य रस्त्यावरच लाखो रुपये खर्च करुन पाण्याची टाकी बांधण्यात आली. त्यासाठी पाणीपुरवठ्याची बोअरवेल गोवरी येथील एका शेतात खोदण्यात आली. या बोअरवेलमधून चिंचोली (खुर्द) आणि निंबाळा गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी भूमिगत पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु भूमिगत पाईपलाईनचे अंतर जास्त लांब असल्याने पाईप लाईन जागोजागी लिकेज झाली. यानंतर पाईपलाईन दुरुस्तीचे काम झाले. बोअरवेल गोवरीला, पाणी पुरवठ्याची टाकी चिंचोली येथे आणि पाणी निंबाळा आणि चिंचोली गावाला पुरविणे म्हणजे दिव्यच. त्यामुळे ही पाणीपुरवठा योजना फार काळ तग धरु शकली नाही. या योजनेत शासनाच्या लाखो रुपयांची उधळपट्टी झाली. मात्र गावकऱ्यांना पाण्याचा थेंबही मिळाला नाही.आजघडीला चिंचोली येथे बहुतांश गावकऱ्यांकडे घरगुती बोअरवेल आहे. गावात सरकारी हातपंप आहे. विहिरी आहेत. मात्र पाण्याची पातळी खोल गेल्याने त्या पूर्णपणे आटल्या आहेत. चिंचोली येथील पाणी हे फ्लोराईडयुक्त आहे. पाणी शुद्ध असेल तर माणसाचे आरोग्य चांगले राहते. मात्र गावकऱ्यांना फ्लोराईडयुक्त पाणी पिण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. दोन वर्षापूर्वी येथे जलशुद्धीकरणाची छोटेखानी टाकी लावण्यात आली. परंतु ग्रामपंचायतीचे नियोजन चुकल्याने गावकरी शुद्ध पाणी पिण्यापासून वंचित राहिले. फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे आजही येथील नागरिकांना सांधेदुखी, डोकेदुखी, यासारख्या अनेक व्याधी जडल्या आहेत. नागरिकांचे दातही पिवळे आहेत. याच गावात २०१० मध्ये तापाच्या साथीमुळे अनेकांना जीव गमवावा लागला होता. तेव्हा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गावात ठाण मांडले होते. गावातील घाणीचे साम्राज्य आणि फ्लोराईडयुक्त दुषित पाणी हेच गावकऱ्यांच्या जिवावर उठल्याने अनेक गावकऱ्यांचा मृत्यू झाला होता. गावाच्या मुख्य रस्त्यावरच आजही घाणीचे साम्राज्य आणि कचऱ्याचे ढिग पसरले आहे. २०१० ची पुनरावृत्ती पुन्हा तर होणार नाही ना, अशी भीती गावकऱ्यात आहे. ग्रामपंचायतीने अनेक ठिकाणी नालीचा उपसा केला नाही. या गावात गेल्या अनेक वर्षापासून पाणीपुरवठा नळ योजना नाही. गावात नळ योजना यावी ही नागरिकांची जुनी मागणी आहे, हे विशेष.