शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

हत्येचा प्रयत्न करणाऱ्याला पाच वर्षांचा कारावास

By admin | Updated: October 23, 2016 01:06 IST

जादुटोन्याच्या संशयावरून संतप्त होत सुरीने सपासप वार करून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

न्यायालयाचा निकाल : जादुटोन्याच्या संशयावरून केली मारहाणचंद्रपूर : जादुटोन्याच्या संशयावरून संतप्त होत सुरीने सपासप वार करून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश के.एल. व्यास यांनी हा निकाल दिला.राजेश गंगाधर पेन्नूरवार (३८) रा. चितेगाव ता. मूल असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी हा सुध्दा चितेगाव येथीलच रहिवासी आहे. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूल तालुक्यातील चितेगाव येथील फिर्यादी हे आपले जेवण आटोपून ग्रामपंचायत चौकात फिरायला गेले. यावेळी आरोपी राजेश गंगाधर पेन्नूरवार हा तिथे आला. त्याने अकारण फिर्यादीसोबत वाद घातला. त्यानंतर तू जादू शिकला आहेस, असे म्हणत जादुटोन्याच्या संशयावरून आरोपी राजेशने फिर्यादीवर सुरीने वार केले. यामुळे फिर्यादीच्या पोटावर व मानेवर गंभीर दुखापत झाली. याबाबत फिर्यादीने मूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून मूल पोलिसांनी वैद्यकीय अहवाल घेऊन आरोपीला अटक केली. त्याच्याविरुध्द अपराध क्र. ६१/२०१३ च्या कलम ३२४, ३०७ नुसार गुन्हा दाखल केला. सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हरमळकर यांनी केला व आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने सदर प्रकरणात साक्षीदार तपासून योग्य पुराव्याच्या आधारे आरोपी राजेश पेन्नूरवार याला पाच वर्ष सक्त मजुरीचा शिक्षा व दहा हजार रुपये दंड ठोठावला. सदर प्रकरणात सरकारतर्फे अ‍ॅड. महाजन यांनी युक्तीवाद केला. (शहर प्रतिनिधी)