शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

पाच तासानंतर ठिय्या आंदोलनाला यश

By admin | Updated: June 24, 2017 00:35 IST

रह्मपुरी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक वाघाला ठार मारा, अन्यथा पकडा अशा मागणीसाठी भयग्रस्त ....

विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात आंदोलन : अखेर त्या नरभक्षक वाघाला ठार मारण्याचे आदेशलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक वाघाला ठार मारा, अन्यथा पकडा अशा मागणीसाठी भयग्रस्त नागरिकांना सोबत घेऊन काँग्रेसचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयात तब्बल पाच तास ठिय्या मांडला. मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी आश्वासनातून हमी देण्याचा प्रयत्न केला. मात्र आ. वडेट्टीवार यांनी जोपर्यंत ठार मारण्याचे आदेश येत नाही, तोपर्यंत येथून हटणार नसल्याचा निर्धार व्यक्त केल्याने वनविभागासमोर पेच निर्माण झाला. दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी सुरू झालेले ठिय्या आंदोलन सायंकाळी ७.४५ वाजेपर्यंत सुरूच होते. अखेर पाच तासानंतर म्हणजे रात्री ७.४५ वाजता वाघाला ठार मारण्याचे आदेश धडकले आणि ठिय्या आंदोलनाची यशस्वी सांगता करण्यात आली. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने(नॅशनल टायगर कन्झर्वेशन अ‍ॅथॉरिटी) वाघाला मारण्याचा निर्णय घेऊन तसा प्रस्ताव प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांना पाठवावा लागतो. त्यांनी आदेश दिल्यानंतरच वाघाला मारता येते, ही बाब मुख्य वनसरंक्षक विजय शेळके यांनी लक्षात आणून दिली असता आ. वडेट्टीवार यांनी सदर प्राधिकरणाच्या नऊही सदस्यांना बोलावून तसा निर्णय घेण्याचा आग्रह धरला. आंदोलकांची कडक भूमिका लक्षात घेऊन मुख्य वनसंरक्षक शेळके यांनी सदस्यांची तातडीची बैठक बोलाविली. या समितीचे अध्यक्ष खुद्द मुख्य वनसंरक्षकच आहे. हे विशेष. ब्रह्मपुरी तालुक्यातील पद्मापूर, भूज, बल्हारपूर, हळदा, बोरगाव, मुडझा, किटाळी, कोसंबी या गावांमध्ये वाघाने धूमाकूळ घातला आहे. मागील तीन महिन्यात पाच जणांचा वाघाने बळी घेतला आहे, तिघांना जखमी केले. नऊ जनावरे ठार मारली, तर २२ जनावरांना जखमी केले आहे.शासनाने वाघाला ठार मारण्याचे आदेश दिल्याने आता शेतकऱ्यांमधील भीतीचे वातावरण दूर होईल. वाघ हा गावाच्या सभोवताल फिरत असल्याने शेतकरी ऐन हंगामात शेतात जाऊ शकत नव्हते. फार दहशतीची परिस्थिती निर्माण झाली होती. या आंदोलनात आमच्यासोबत शेतकऱ्यांचाही सहभाग असल्याने शासनाला झुकावे लागले.-विजय वडेट्टीवार, आमदार