शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसांनंतरही अपहृत शुभमचा पत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:26 IST

घुग्घुस ; वेकोलिच्या घुग्घुस कामगार वसाहतमधील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी शुभमचा अपहरणाच्या पाचव्या दिवशीही शोध न लागल्याने कामगार वसाहतमधील रहिवासी ...

घुग्घुस ; वेकोलिच्या घुग्घुस कामगार वसाहतमधील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी शुभमचा अपहरणाच्या पाचव्या दिवशीही शोध न लागल्याने कामगार वसाहतमधील रहिवासी चिंताग्रस्त झाले आहेत.

पाच दिवस लोटूनही पोलिसांच्या तपासाला यश आले नाही. पोलिसांकडून तपासाबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात येत असल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह लागले आहे. शुभमच्या वडिलांची मित्रमंडळीसुद्धा घुग्घुस, चंद्रपूर, भद्रावती, वणी परिसर पिंजून काढत आहे.

रामनगर वसाहतमधील दिलीप फुटाणे यांचा मुलगा शुभम हा रविवारी सायंकाळी घरून गेला. त्यानंतर भ्रमणसेवेवरून रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान अपहरण आणि दोन दिवसात ३० लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आली. मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी तत्काळ तपास चक्रे फिरविली. विविध दिशेने घुग्घुस, चंद्रपूर पोलिसांचे पथक शुभमच्या शोधात आहे. मात्र त्याचा शोध लागला नाही. शुभमच्या आप्तमित्रांनीसुद्धा हा परिसर पिंजून काढला. मात्र त्याचा शोध किंवा सुगावा लागला नाही.

रविवारी त्या भ्रमणसेवेचे लोकेशन चंद्रपूर रस्त्यावरील घुग्घुसनजीकच्या एक पेट्रोल पंपाजवळ मिळाल्याचे समजते. मात्र त्यानंतर भ्रमणसेवेचे लोकेशन मिळाले नाही. जसे दिवस लोटत आहेत, तसे अपहरणाबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. पोलीस तपासाबाबत अतिशय गुप्तता बाळगत असल्याने पोलीस कोणत्या दिशेने तपास करीत आहेत, हे कळत नाही. मात्र शुभमच्या अपहरणाने रामनगर कामगार वसाहतीमधील कामगार चिंताग्रस्त झाले आहेत.