शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

शंकरपुरात साकारले जिल्ह्यातील पहिले मॉडेल ग्राम सचिवालय

By admin | Updated: June 22, 2015 01:08 IST

इच्छाशक्तीच्या बळावर काहीही होवू शकते. याच ईच्छाशक्तीच्या भरवशावर चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे मॉडेल ग्रामसचिवालयाची वास्तू साकार झाली आहे.

मानाचा तुरा : अत्याधुनिक व वातानुकूलित सोयी उपलब्ध अमोद गौरकार  शंकरपूरइच्छाशक्तीच्या बळावर काहीही होवू शकते. याच ईच्छाशक्तीच्या भरवशावर चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे मॉडेल ग्रामसचिवालयाची वास्तू साकार झाली आहे. अत्याधुनिक व वातानुकूलित सुविधेने हे ग्रामसचिवालय परिपूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील हे पहिलेच ग्राम सचिवालय आहे.शंकरपूर हे गाव १२ हजार लोकवस्तीचे आहे. या गावचा विकास ग्रामपंचायती मार्फत होत आहे. या गावातील सर्व रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण व डांबरीकरणने तयार झाले आहे. ९० टक्के गाव हागणदारीमुक्त झाले आहे. तर शासकीय इमारती, सभागृह, लॉन बांधून तयार आहेत. तीन मजली डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलाची आकर्षक वास्तू बांधण्यात आली आहे. खाली दोन्ही माळे बेरोजगार युवकांसाठी उद्योग लावण्यासाठी देण्यात आले आहे, तर वरच्या माळ्यात न्यायायशाळा व अभ्यासकेंद्र उभारण्यात आले आहे.सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या गावात महाराष्ट्रात नसेल असे ग्रामसचिवालय निर्माण करण्याचा मानस ग्रामपंचायतीचे नेतृत्व करणारे जि.प. सदस्य डॉ. सतिश वारजूकर यांनी केला होता. त्या अनुषंगाने त्यांनी जि.प.कडून निधी प्राप्त केला आहे. जुन्या असलेल्या ग्रामसचिवालयावरच दुसऱ्या माळ्याचे बांधकाम सुरु केले. सर्वप्रथम सरपंचाची खोली, कर्मचाऱ्यांची खोली, ग्रामविस्तार अधिकाऱ्याची खोली आणि मिटींग हॉल बांधण्यात आले. या सर्व खोल्यांमध्ये वातानुकुलित यंत्रणा लावण्यात आली आहे. यासोबतच हे ग्रामसचिवालय संगणकाशी जोडण्यात आले आहे. येथील टेबल, खुर्च्या, बैठक व्यवस्था अत्याधुनिक आहे. सचिवालय पाहणारा नागरिक काही क्षणासाठी का होईना अचंबीत होतो.जग इंटरनेटशी जोडल्या जात आहे. त्यामुळे हे ग्रामसचिवालय जगाशी जोडण्यासाठी ग्रामपंचायतीने स्वत:चे वायफाय नेटवर्क गावात स्थापन केले आहे. त्यामुळे आगामी काळात ग्रामसचिवालय पेपरलेस करण्याचा मानस आहे. याच ग्रामसचिवालयात दोन खाटेचे विश्रामगृह बांधण्यात आले आहे. गावाशेजारी पर्यटनस्थळ आहे. या पर्यटनस्थळाला बघण्यासाठी पर्यटक येत असतात. त्यांना राहण्यासाठी व गावातील पाहुण्यांना राहण्यासाठी उत्तम व्यवस्था या विश्रामगृहात केली आहे. या विश्रामगृहाचे महात्मा ज्योतिबा फुले असे नामकरणही करण्यात आले आहे. गावातील कारभार सांभाळण्यासाठी ग्रामपंचायतीची निर्मिती झाली. परंतु प्रत्येक गावात दोन खोल्यांची ग्रामपंचायत आहे. तेथूनच ते गावाचा कारभार सांभाळल्या जातो. परंतु ईच्छाशक्ती असेल तर ग्रामपंचायत भवन असेही असू शकते, हे शंकरपूर ग्रामपंचायतीने दाखवून दिले आहे. एकूणच जिल्ह्यातील पहिलेवहिले हे ग्रामसचिवालय ठरले आहे.