शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

अखेर सभापतींच्या माफीने सभेला सुरूवात

By admin | Updated: February 12, 2015 00:51 IST

पंचायत समितीच्या मासिक सभेला सुरुवात होण्यापूर्वी आजी- माजी सभापती व उपसभापतीमध्ये शाब्दिक वाद झाला. अखेर सभापतींनी माफी मागितल्यावर सभेला सुरुवात झाली.

ब्रह्मपुरी : पंचायत समितीच्या मासिक सभेला सुरुवात होण्यापूर्वी आजी- माजी सभापती व उपसभापतीमध्ये शाब्दिक वाद झाला. अखेर सभापतींनी माफी मागितल्यावर सभेला सुरुवात झाली.पंचायत समितीच्या सभागृहात मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभागृहात माजी सभापती वंदना शेंडे व माजी उपसभापती नामदेव लांजेवार गेले असता त्यांच्या नावाची खुर्ची सभागृहातील सर्वात शेवटच्या रांगेत लावण्यात आली होती. प्रोटोकालनुसार माजी पदाधिकाऱ्यांची खुर्ची कुठे लावली जावी, याचेही संकेत आहेत. मात्र संबंधित कर्मचाऱ्यांनी माजी पदाधिकाऱ्यांची बसण्याची व्यवस्था मागच्या रांगेत केली होती. परंतु हा प्रकार पाहून माजी पदाधिकारी संतापले. यापूर्वी खुर्चीवर नावाची पट्टी लावली जात नव्हती. नवीन सभापतींनी हा प्रकार आपल्या कार्यपद्धतीचा भाग म्हणून खुर्चीवर नावाची पट्टी लावली. परंतु त्याचा परिणाम उलटा झाला. यावरून आजी- माजी पदाधिकाऱ्यांमध्ये वादही झाला. लगेच माजी पदाधिकारी व काही सदस्य बाहेर आले व दुसऱ्या कक्षात जाऊन बसले. झालेला सर्व प्रकार पाहून कर्मचाऱ्यांना वाईट वाटले. कर्मचारी ‘त्या’ कक्षाकडे येऊन त्यांनी माजी पदाधिकाऱ्यांची माफी मागितली. परंतु माजी पदाधिकाऱ्यांचे यावर समाधान झाले नाही. अखेर चक्क सभापतींनी त्या कक्षात जाऊन माफी मागितल्यानंतर हा वाद निवळला व सभेला सुरुवात झाली. पंचायत समितीमध्ये उपसभापती पद भाजपाकडे असूनही भाजपाच्या माजी पदाधिकाऱ्यांचा होणारा अपमान हा यावेळेस चर्चेचा विषय होता. (तालुका प्रतिनिधी)