शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

वरोरा येथे हत्तीरोग जनजागृती अभियान रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 06:00 IST

हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेला बल्लारपूर तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्राचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम आणि त्यांच्या चमूद्वारे सोमवारपासून करण्यात आली आहे. या मोहिमेतंर्गत ग्रामीण भागातील ४२ हजार ७९१ व बल्लारपूर शहरातील ३२ वॉर्डात ८३ हजार ७३७ अशी एकूण एक लाख २६ हजार ५२८ नागरिकांना ही औषधी देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देविविध ठिकाणी कार्यक्रम : प्राथमिक आरोग्य केंद्रात गोळ्यांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : महारोगी सेवा समिती आनंदवन वरोराव्दारा संचालित आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा व ग्रामीण रुग्णालय कोसरसार, राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत संयुक्त विद्यमाने हत्तीरोगाचे दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेला सुरुवात करण्यात आली.आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मृणाल काळे यांच्या मार्गदर्शनात व प्रा. नरेंद्र पाटील याच्या नेतृत्वात शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी विविध घोषवाक्याद्वारे हत्तीरोग समूळ उच्चटणाबाबत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी प्रा. बबन अवघडे, प्रा. मोक्षदा नाईक, प्रा. कल्यानी आत्राम, प्रा. मनोहर चौधरी, प्रा. राठोड, सर्व कर्मचारी, रा. स. योजनेचे स्वयंसेवक, स्वयंसेविका यांच्यासह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.एक लाख २६ हजार नागरिकांना लाभबल्लारपूर : हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेला बल्लारपूर तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्राचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम आणि त्यांच्या चमूद्वारे सोमवारपासून करण्यात आली आहे. या मोहिमेतंर्गत ग्रामीण भागातील ४२ हजार ७९१ व बल्लारपूर शहरातील ३२ वॉर्डात ८३ हजार ७३७ अशी एकूण एक लाख २६ हजार ५२८ नागरिकांना ही औषधी देण्यात येणार आहे. या मोहिमेत शहरी विभागात ७५ कर्मचारी, सात सुपरवायझर, ग्रामीण विभागात ८ उपकेंद्रातंर्गत नऊ बुथवर ३२ गावात ३५६ कर्मचारी ३८ पर्यवेक्षक व सहा डॉक्टरांची चमू प्रयत्न करीत आहे.नवेगाव पांडव येथे औषधोपचार मोहिमेला सुरुवातनागभीड : हत्तीरोग दुरीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, नवेगाव पांडवच्या वतीने गृहभेटीद्वारे औषधी गोळ्यांचे वितरण करण्यात आले. या मोहिमेची सुरूवात जि.प.सदस्य संजय गजपुरे यांना गोळ्या देऊन करण्यात आली. सदर मोहीमेसाठी प्रा. आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका मडावी यांच्या नेतृत्वात आरोग्य सहाय्यक डब्ल्यू. एम. बारापात्रे, ए. जे. रावेकर , आरोग्य सेवक एस. डी. खनके, आशा गटप्रवर्तक हेमा नाकाडे, आशा वर्कर शिल्पा अमृतकर यांची चमू गृहभेट करुन हत्तीरोग निर्मुलनासंदर्भात माहिती देत औषधी गोळ्यांचे वितरण करण्यात येत आहे.सिंदेवाहीत हत्तीरोग दुरीकरण मोहीमसिंदेवाही : राष्ट्रीय किटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमातंर्गत हत्तीरोग दुरीकरण मोहीमेला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. यावेळी तहसीलदार गणेश जगदाळे, नायब तहसीलदार धात्रक, सलामे यांच्या उपस्थितीत सर्व कर्मचाऱ्यांना गोळ्या खाण्यासाठी देण्यात आल्या. याप्रसंगी सभापती मंदा बाळबुधे, संवर्ग विकास अधिकारी इल्लुरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललितकुमार पटले उपस्थित होते.

टॅग्स :Healthआरोग्य