शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णमृत्यूचा पाचचा पाढा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 05:00 IST

मागील २४ तासात पाच मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये, शिवाजी नगर, खेड ब्रह्मपुरी येथील ६५ वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला ११ सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने १२ सप्टेंबरला रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्यांचा मृत्यू झाला आहे. दुसरा मृत्यू बामणवाडा राजुरा येथील ५२ वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे.

ठळक मुद्देनव्या २९० बाधितांची भर : सलम तिसऱ्या दिवशीही पाच मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात रविवारी म्हणजे सलग तिसºया दिवशी आणखी पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. मागील तीन दिवसात दरदिवशी पाच असे मिळून १५ बाधितांना जीव गमवावा लागला आहे. याशिवाय रविवारी नव्या २९० बाधितांचीही भर पडली आहे. आतापर्यंत कोविड संक्रमित बाधितांची संख्या पाच हजार ८५८ झाली आहे. आतापर्यंत तीन हजार २६१ बाधित कोरोनामुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या दोन हजार ५२६ बाधित उपचार घेत आहेत.मागील २४ तासात पाच मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये, शिवाजी नगर, खेड ब्रह्मपुरी येथील ६५ वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला ११ सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने १२ सप्टेंबरला रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्यांचा मृत्यू झाला आहे. दुसरा मृत्यू बामणवाडा राजुरा येथील ५२ वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला १२ सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने १२ सप्टेंबरला रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे मृत्यू झाला आहे. तिसरा मृत्यू नगिना बाग, चंद्रपूर येथील ३७ वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला ४ सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने १२ सप्टेंबरला रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे मृत्यू झाला आहे. चवथा मृत्यू वणी यवतमाळ येथील ५३ वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता. तर, पाचवा मृत्यू बिकली नागभीड येथील ५३ वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे.अन्य तालुक्यातील बाधितरविवारी ब्रह्मपुरी तालुक्यातील फुले नगर, बालाजी वार्ड, मालडोंगरी, वाल्मिक नगर, आवळगाव, संताजी नगर, गांगलवाडी, विद्या नगर, कमला नगर परिसरातून बाधित ठरले आहे. सावली तालुक्यातील निमगाव, व्याहाळ बु., लोढोली भागातून बाधित पुढे आले आहेत. मूल तालुक्यातील राजगड, बोरचांदली भागातून बाधित ठरले आहेत. वरोरा येथील पदमालय नगर, अभ्यंकर वार्ड, बोर्डा, पोलीस स्टेशन परिसर, एकार्जुना परिसरातून बाधित ठरले आहेत. पोंभुर्णा तालुक्यातील जामखुर्द भागातून बाधित पुढे आले आहेत. राजुरा तालुक्यातील सोमनाथ पूर, चुनाभट्टी वार्ड, बामणवाडा परिसरातून बाधित ठरले आहेत. नागभीड तालुक्यातील तळोधी, राम मंदिर चौक भागातून बाधित पुढे आले आहेत. बल्लारपूर तालुक्यातील कन्नमवार वार्ड, विवेकानंद वार्ड, दादाभाई नौरोजी वार्ड, गांधी वार्ड, डॉ.झाकीर हुसेन वार्ड, महाराणा प्रताप वार्ड भागातून पॉझिटिव्ह ठरले आहेत. चिमूर तालुक्यातील शंकरपूर, गुरुदेव वार्ड, गांधी वार्ड, नेहरू वार्ड भागातून बाधित पुढे आले आहेत. कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथून बाधित ठरले आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील धाबा भागातून पॉझिटिव्ह ठरले आहेत. भद्रावती येथील पंचशिल नगर, एकता नगर, नवीन सुमठाणा भागातून बाधित पुढे आले आहेत.चंद्रपुरातील बाधितरविवारी चंद्रपूर शहरातील तुकूम, वाघोबा चौक, दुर्गापूर, मारडा, रामनगर, रयतवारी, अंचलेश्वर वार्ड, भानापेठ, जुनोना, जीएमसी परिसर, बाबुपेठ, कपिल चौक, कोतवाली वार्ड, पठाणपुरा वार्ड, गंजवार्ड, मोरवा, बालाजी वार्ड, वडगाव, उत्तम नगर, अशोक नगर, बाजार वार्ड, भिवापूर वार्ड, श्याम नगर, गणेश नगर तुकूम, हनुमान मंदिर चौक, विठ्ठल मंदिर वार्ड भागातून बाधित पुढे आले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या