वरोरा रेल्वे स्थानकावर महिलेचा उष्माघाताने मृत्यू

By Admin | Updated: June 1, 2015 01:30 IST2015-06-01T01:30:31+5:302015-06-01T01:30:31+5:30

रेल्वे स्थानक वरोराच्या प्लॅटफॉर्मवरील बेंचवर ६५ वर्षीय महिला सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास झोपलेल्या अवस्थेत आढळली.

Feminine death of woman at Warora railway station | वरोरा रेल्वे स्थानकावर महिलेचा उष्माघाताने मृत्यू

वरोरा रेल्वे स्थानकावर महिलेचा उष्माघाताने मृत्यू

वरोरा : रेल्वे स्थानक वरोराच्या प्लॅटफॉर्मवरील बेंचवर ६५ वर्षीय महिला सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास झोपलेल्या अवस्थेत आढळली. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने सदर महिलेस उपचाराकरिता वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता सदर महिलेला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. सदर महिला अनोळखी असून महिलेचे शरीर खूप तापून होते, त्यामुळे उष्माघाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
प्लॉट फॉर्म क्रमांक दोन वरील बेंचवर एक अनोळखी महिला झोपून असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाचे जवान सिद्धार्थ वाघ यांच्या लक्षात आले. दुपारी ४ वाजता त्या महिलेजवळ जाऊन त्यांनी चौकशी केली असता महिला बोलली नाही. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाचे जवान सिद्धार्थ वाघ यांनी महिलेला उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात नेले.
मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलेला मृत घोषित केले. मृत महिलेचे वय अंदाजे ६५ वर्ष आहे. तिची ओळख पटविण्याचे काम पोलीस विभागाकडून सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Feminine death of woman at Warora railway station