शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
2
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
3
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
6
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
7
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
8
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
9
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
10
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
11
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
12
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
13
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
14
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
15
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
16
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
17
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
18
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
19
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
20
बाल्कनीतून कबुतरांना हटवण्याचा सर्वात सोपा अन् प्रभावी उपाय; समस्येतून मिळेल कायमचा तोडगा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना चिंतामुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 06:00 IST

ज्या भागांमध्ये ज्या ज्या पिकाचे उत्पादन होते, त्या विभागांमध्ये क्लस्टर तयार करण्यात येऊन शेतमालावर आधारित प्रक्रिया करणारे उद्योग येत्या काही दिवसात उभे राहणार असल्याचे ना. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी नैसर्गिकरित्या जळालेल्या घरांना शासनाकडून निधी उपलब्ध होत नव्हता. यानंतर जळालेल्या घरमालकांना शासकीय निधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार । चंद्रपूर व ब्रह्मपुरीत पालकमंत्र्यांचा नागरी सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर/ब्रह्मपुरी : १७ जानेवारीला नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ झाल्याचे पत्र मंत्रालयातून जिल्हाधिकाºयांकडे आले असल्याचे सांगून माझ्या मागणीनुसारच शेतकऱ्यांना धानाला २५०० रुपये भाव व ७०० रुपये बोनस मिळाला आहे. दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना सन्मान दिला आहे. शेतकऱ्यांना चिंतामुक्त केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.विजय वडेट्टीवार हे मंत्री झाल्यानंतर प्रथमच चंद्रपूर व ब्रह्मपुरी येथे आले. यावेळी त्यांचे दोन्ही ठिकाणी जंगी स्वागत करून नागरी सत्कार करण्यात आला.चंद्रपूर येथील कार्यक्रम गांधी चौकात घेण्यात आला. तत्पूर्वी शहरात रॅली काढण्यात आली. यावेळी खा. बाळूभाऊ धानोरकर, आ. सुभाष धोटे, आ. किशोर जोरगेवार, शहर अध्यक्ष नंदू नगरकर, प्रदेश सचिव प्रकाश देवतळे, माजी अध्यक्ष सुभाषसिंह गौर, माजी आमदार देवराव भांडेकर, सुनिता लोढिया, जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेता सतीश वरजुरकर, राजुऱ्याचे नगराध्यक्ष अरुण धोटे, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर आदी उपस्थित होते.ब्रह्मपुरी येथील कार्यक्रम पंचशील वसतिगृहाच्या प्रांगणात पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी प्रवक्ते अतुल लोंढे, प्रमुख अतिथी म्हणून आमदार सहसराम कोरेट्टी, गुडू अवस्थी, प्रकाश देवतळे, नगराध्यक्षा रिता उराडे, उपाध्यक्ष अशोक रामटेके, गोविंद भेंडारकर, देविदास जगनाडे आदी उपस्थित होते.शेतमालावर आधारित उद्योग आणणारज्या भागांमध्ये ज्या ज्या पिकाचे उत्पादन होते, त्या विभागांमध्ये क्लस्टर तयार करण्यात येऊन शेतमालावर आधारित प्रक्रिया करणारे उद्योग येत्या काही दिवसात उभे राहणार असल्याचे ना. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी नैसर्गिकरित्या जळालेल्या घरांना शासनाकडून निधी उपलब्ध होत नव्हता. यानंतर जळालेल्या घरमालकांना शासकीय निधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. बारामतीच्या धर्तीवर कृषीशी संबंधित शिक्षणाच्या सोयीसाठी कृषी विज्ञान केंद्र उभारण्याचा आपला मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार