शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविणार

By Admin | Updated: December 24, 2014 22:57 IST2014-12-24T22:57:13+5:302014-12-24T22:57:13+5:30

कृषीप्रधान देशात प्रत्येक राज्यातील शेतकरी जोपर्यंत सुखी होणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या कल्याणकारी योजना राबवून शेवटच्या टोकावरील

Farmers' welfare schemes will be implemented | शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविणार

शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविणार

हंसराज अहीर : प्रभाकर मामुलकर यांचा सत्कार
राजुरा : कृषीप्रधान देशात प्रत्येक राज्यातील शेतकरी जोपर्यंत सुखी होणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या कल्याणकारी योजना राबवून शेवटच्या टोकावरील शेतकऱ्याला समाधान प्राप्त करुन देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असे प्रतिपादन रसायन व खते केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
राजुरा येथे आयोजित शेतकरी मेळावा, कृषी व तंत्र व्यवसाय प्रदर्शन व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना. हंसराज अहीर होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार सुदर्शन निमकर, ज्युनिअर अमिताभ बच्चन, भाजपाचे विधानसभा प्रमुख खुशाब बोंडे, राजुरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत गुंडावार, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अरुण मस्की, राजुरा व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष बंडू माणूसमारे, गोंडी सिने अभिनेता रमेश आत्राम, प्राचार्य दौलतराव भोंगळे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुराचे उपाध्यक्ष श्रीधर गोडे, कार्याध्यक्ष मुर्लीधर धोटे, जाहेद हुसेन बियाबानी, दत्तात्रय येगीनवार, दिलीप नलगे, सतिश धोटे, माजी आमदार एकनाथ साळवे, रमजान अली, जिल्हा परिषद सभापती प्रा. संभा वरकड, देवराव भोंगळे, शांताराम चौखे, अनिल फुलझेले उपस्थित होते. यावेळी माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, सुमन मामुलकर यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच प्रा. आर. डी. बारई लिखित पुस्तकाचे प्रकाशन, संमोहन तज्ज्ञ जि.प. सदस्य देवराव भोंगळे, जितेंद्र विरुटकर यांचा सत्कार करण्यात आला. शिवाजी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी सरला गादंगीवार, चंद्रशेखर मादनेलवार, सनोवर बेग, शामलाल राठोड, गिता चिंतुरवार, सोनी गड्डमवार, विजय कुळमेथे, राहुल भिडकर, अरुण कुमरे, आडकु कुमरे, जयतू कोडापे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तथा संस्थेच्या वतीने स्कूल बसचे विमोचन तथा माजी आमदार प्रभाकर मामुलकर यांचेकडून स्वामी विवेकांनद अनाथ आश्रमाला २१ हजाराचा धनादेश प्रदान करण्यात आला. ह्युमन राईट कान्सील आॅफ इंडियाच्या वतीने ना. हंसराज अहीर यांचा लाडुतूला करण्यात आला.
प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांनी केले. संचालन प्रा. बी. यू. बोर्डेवार यांनी केले. तर आभार बादल बेले यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Farmers' welfare schemes will be implemented