शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कृषिशास्त्रज्ञांकडून शेतशिवाराची पाहणी

By admin | Updated: October 20, 2015 01:20 IST

तालुका कृषी अधिकारी पोंभुर्णा यांच्या वतीने जिल्हा मासिक चर्चासत्र व प्रक्षोभ भेटीचे आयोजन करण्यात आले. या

पोंभुर्णा : तालुका कृषी अधिकारी पोंभुर्णा यांच्या वतीने जिल्हा मासिक चर्चासत्र व प्रक्षोभ भेटीचे आयोजन करण्यात आले. या प्रक्षोभ भेटीच्या कार्यक्रमात चंद्रपूरचे कृषी सहसंचालक तपस्कर, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कृषिशास्त्रज्ञ डॉ.नेहारकर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. त्यांनी यावेळी पोंभुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी व केमारा येथील शेतशिवाराला भेट देऊन पाहणी केली.यावेळी डोंगरहळदी येथील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पूर्ण करण्यात आलेले शेततळे आणि त्यातून धानपिकाला मिळणारे पाणी या संपूर्ण बाबीची संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी केली. दरम्यान येथील लाभार्थी शेतकरी कवडू कन्नाके व सोनु आत्राम यांनी अधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले की, यापूर्वी हा परिसर कोरडवाहू क्षेत्र असल्याने आणि याठिकाणी सिंचनाची सोय नसल्याने केवळ निसर्गावर अवलंबून शेती व्यवसाय करावा लागत होता. त्यामुळे अनेकदा धानपीक हाती लागत नव्हते. सततच्या नापिकीमुळे आमच्यावर कर्जाचे डोंगर वाढत जायचे.परंतु कृषी विभागाच्या जलयुक्त शिवार या योजनेमुळे तालुका कृषी अधिकारी भाष्कर गायकवाड यांच्या प्रयत्नातून आमच्या शेतीमध्ये शेततळे झाल्याने आम्हाला नवसंजीवनी मिळाली आहे. आज आमचे धानपिक सिंचनाच्या पुरेशा सोयीमुळे बहरले असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले तर यावरच न थांबता उर्वरित शेततळ्यातील पाण्यावर कांदा व भाजीपाला पिकाचे उत्पादन घेऊन कुटुंबात आर्थिक भर निर्माण करण्यात येणार असल्याचे मत सुद्धा प्रगट केले. बांधावर बहरलेल्या तुर पिकामुळे वर्षभर कुटुंबाला डाळीचा उपयोग होणार असल्याचेसुद्धा सांगितले.यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी केमारा व डोंगरहळदी येथील शेतकऱ्यांच्या धानपिकावर विविध रोगांनी आक्रमण केलेल्या शेतांची पाहणी केली. यामध्ये कडपा, कडाकरपा, खोडकिडा तसेच तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला. यावर नियंत्रक उपाय म्हणून उपस्थित असलेले कृषिशास्त्रज्ञ डॉ.नेहारकर यांनी संबंधित शेतकऱ्यांना उपाययोजनेविषयी मार्गदर्शन केले. या प्रक्षोभ भेटीच्या कार्यक्रमात गिरीधरसिंह बैस, नीळकंठ नैताम व इतर शेतकरी उपस्थित होते.प्रक्षोभ भेटीच्या कार्यक्रमानंतर पोंभुर्णा येथील पंचायत समितीच्या सभागृहात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी यांनी तालुक्यातील विविध पिकांवर येणारे रोग व किडीबाबत अहवालाचे वाचन केले. पिकांवर येणाऱ्या विविध रोग व किडीवर नियंत्रण व उपचाराबाबत कृषिशास्त्रज्ञ डॉ.नेहारकर तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूरचे डॉ.हसनाबादे यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.सदर चर्चासत्राच्या कार्यक्रमाचे संचालन तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड यांनी तर आभार मंडळ कृषी अधिकारी विजय काळे यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी पर्यवेक्षक नगराळे, कृषी सहायक डोंगरे व टोंगलवार यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)