शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
4
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
5
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
6
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
7
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
8
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
9
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
10
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
11
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
12
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
13
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
14
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
15
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
16
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
17
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
18
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
19
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
20
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
Daily Top 2Weekly Top 5

धान वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

By admin | Updated: October 10, 2015 00:17 IST

तालुक्यात प्रचंड उष्णतेमुळे पीक करपायला लागले आहे. पिकाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असून शेतीजवळ ....

पाण्याचे संकट : उष्णतेमुळे पीक लागले करपायलासिंदेवाही : तालुक्यात प्रचंड उष्णतेमुळे पीक करपायला लागले आहे. पिकाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असून शेतीजवळ असलेल्या विविध पाणी स्त्रोतून आईल इंजिनच्या साहाय्याने पिकांसाठी पाणी देण्याचे काम सध्या शेतकरी रात्रंदिवस करीत आहे.तालुक्यात सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे खरीप हंगामात पावसाच्या भरवशावर शेतकरी धानाचे पीक घेतात. अशा परिस्थितीत शेतकरी शेताजवळून वाहणारी नदी, नाले, बोडी, तलाव आदीमधून इंजिन व वीज पंपाद्वारे पाणी घेत असतात. यावर्षी पावसाळ्यात पाऊस कमी झाला. दरवर्षी पेक्षा पाऊस कमी पडल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. अनेक शेतांमध्ये पाणी नसल्या कारणाने रोवणीच झाली नाही. ज्यांनी विलंबाने रोवणी केली. त्यात धानाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. सध्या मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. उन्हाच्या काहिलीने धान पीक करपू लागले आहे. ते जगविण्यासाठी शेतकरी नाले, नदी आदी स्त्रोतांद्वारे पाणी दिले जात आहे. काही भागात धानावर विविध रोगांचा थैमान असून शेतकरी त्रस्त आहेत. शासनाने तालुका दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)