शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शेतजमिनीच्या मालकी हक्कासाठी शेतकऱ्याचा संघर्ष

By admin | Updated: February 7, 2016 02:01 IST

स्वत:च्या शेतजमिनीचा मालकी हक्काचा सातबारा असुनसुद्धा काही अतिक्रमणधारकांनी त्या जागेवर कब्जा केल्याने मूळ शेतकऱ्याला मालकी हक्काच्या ...

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : २० वर्षांपासून झिजवत आहेत शासकीय उंबरठेपोंभुर्णा : स्वत:च्या शेतजमिनीचा मालकी हक्काचा सातबारा असुनसुद्धा काही अतिक्रमणधारकांनी त्या जागेवर कब्जा केल्याने मूळ शेतकऱ्याला मालकी हक्काच्या शेतजमिनीवर वहीवाट करून उत्पादन घेण्यापासून मुकावे लागत आहे. देवाडा खुर्द येथील रामपूर दीक्षित शेतशिवारामध्ये हा प्रकार घडला आहे. पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा (खुर्द) येथील रामपूर दीक्षित शेतशिवारामध्ये जामतुकूम येथील शेतकरी शंकर कोसमशिले यांना सर्वे नं. ११/१ मध्ये सन ९५-९६ मध्ये शासनाकडून २.६७ हे.आर. जागेचा पट्टा मिळाला. त्यांच्या वडिलोपार्जीत या शेतजमिनीवर भलत्याच व्यक्तीने अतिक्रमण करून तो त्यात उत्पादन घेत आहे. मुळ शेतकरी आपल्या जागेवर वहिवाट करण्यास गेला असता अतिक्रमणधारकाने त्याला मारहाण केली. संबंधित शेतकरी कायदेशिर मार्गाचा अवलंब करून २० वर्षापासून शासन दरबारी हेलपाटे मारून संघर्ष करीत आहेत. संबंधित अतिक्रमणधारक हे सत्ताधारी पक्षाच्या एका कार्यकर्त्याच्या निकटवर्तीय असल्याने शासकीय स्तरावरून त्यांना न्याय मिळणे कठिण झाले आहे.सन १९९५-९६ पासून त्यांना शासनामार्फत दुष्काळग्रस्त निधी व पुरग्रस्त निधीचा लाभ मिळत आहे. परंतु स्वत:ची जमिन कसून उत्पादन घेण्याचा अधिकार मात्र २० वर्षाचा संघर्ष करूनही मिळाला नाही. याबाबत अन्यायग्रस्त शेतकऱ्याने तलाठी, तहसील कार्यालय, भूमि अभिलेख कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत. परंतु अजुनही त्याला शासनाकडून न्याय मिळाला नाही. यासंदर्भात प्रशासनाला वारंवार विनंत्या अर्ज करूनही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. (तालुका प्रतिनिधी)