शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन सातबारासाठी शेतकऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2016 00:48 IST

भारत हा कृषिप्रधान देश आहे. तसेच हा खेड्यांचा शेतकऱ्यांचा देश आहे. या देशात ८० टक्के शेती आहे.

१५ दिवस लागणार : पटवाऱ्याच्या रेकॉर्डनुसार सातबाराचे वाटपभिसी : भारत हा कृषिप्रधान देश आहे. तसेच हा खेड्यांचा शेतकऱ्यांचा देश आहे. या देशात ८० टक्के शेती आहे. शेतीवर उपजीविका करणारे शेतकरी सर्व खेडेगावातील आहेत. पण या शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून या ना त्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा या शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. अशातच आता आॅनलाईन सातबारासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे.शेतकऱ्यांनी ज्या दिवशी अर्ज केला त्याच दिवशी सातबारा मिळत नाही. चार-पाच दिवसानंतर सातबाराची झेरॉक्स प्रत मिळते. चिमूर तालुक्यात २५९ गावांची संख्या असून या सर्व गावांतील कृषी क्षेत्र ३६ हजार ३६० हेक्टर आर. चौरस किलोमीटर आहे. एकूण ४० तलाठी या सर्व साज्यांचे काम सांभाळतात. सर्व तलाठ्यांनी आपला शेतीचा पूर्ण दस्ताऐवज तहसीलमध्ये जमा केल्याने व आॅनलाईन सातबारा तहसीलमधून मिळते, अशी शेतकऱ्यांची खात्री झाल्याने सातबारासाठी शेतकरी तहसीलमध्ये एकच गर्दी करू लागतात. ३१ मार्च पूर्वी शेतकऱ्यांना सोसायटी किंवा बँकेचे पीक कर्ज मिळविण्यासाठी सातबारा द्यावा लागतो. सध्या शेतकऱ्यांना सातबाराची झेरॉक्स प्रत मिळत असल्याने भर उन्हातही त्यांची धावपळ होताना दिसत आहे.तहसीलमध्ये नायब तहसीलदारांची तीन पदे रिक्त असल्याने कामाचा ताण वाढला आहे. परिणामी तहसीलमधील इतर कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत आहे. त्यामुळे आॅनलाईन सातबारासाठी उशीर होत असल्याचे तहसीलदार महल्ले यांनी सांगितले. आता उन्हाळ्याचे दिवस असल्याने भर उन्हात सातबारासाठी धावपळ करावी लागत असल्याने त्रास होतो. असे मालेवाडा मांगलगाव, सावरगाव इतर गावातील शेतकऱ्यांनी मत व्यक्त केले. यापूर्वी तलाठ्याकडे गेले की लगेच सातबारा मिळायचा. धावपळ, गर्दी नसायची. आता तर रांगेमध्ये उन्हातान्हात उभे राहावे लागते. पूर्वीप्रमाणे पटवाऱ्याकडून सातबारा मिळावा, अशी अपेक्षाही काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)आॅनलाईन सातबारा देण्यासाठी संगणकामध्ये काही त्रुटी असल्यामुळे व काम पूर्ण न झाल्यामुळे अडचण येत आहे. सध्या शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन तलाठ्याच्या रेकॉर्डनुसार झेरॉक्स प्रत काढून सातबारा देण्यात येत आहे. तसेच ३१ मार्चचा विचार करून शेतकऱ्यांना सातबारा देण्यासाठी होळीनंतर शुक्रवार, शनिवार व रविवार सुटी असताना कार्यालय सुरू होते. येत्या १५ दिवसांत त्रुट्या दूर झाल्या की, आॅनलाईन सातबारा देण्यात येईल.- संतोष महल्ले, तहसीलदार