शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:28 IST

नागभीड : तालुक्यात पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजार रुपये जमा करून शेतकऱ्यांची थट्टा सुरू केली आहे. ...

नागभीड : तालुक्यात पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजार रुपये जमा करून शेतकऱ्यांची थट्टा सुरू केली आहे. ही रक्कम बघून भीक नको पण कुत्रा आवर, असे म्हणण्याची पाळी आली आहे.

गत हंगामाचा विचार केला तर अगोदर परतीच्या पावसाने आणि नंतर विविध रोगांनी तालुक्यातील धान पीक पुरते नेस्तनाबूत झाले. प्रत्येक गावातील जाहीर करण्यात आलेली शासकीय पैसेवारीही ५० टक्क्यांच्या आत आहे. तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजार रुपयांची रक्कम टाकून विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचा उपमर्द केल्याची भावना शेतकरी वर्गात व्यक्त होत आहे.

नागभीड तालुक्यात धानाचे एकमेव पीक घेतले जाते. एकूण क्षेत्रफळापैकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात हे पीक घेण्यात येते. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने हे पीक घेण्यासाठी शेतकरी गावातील सेवा सहकारी आणि आदिवासी विविध कार्यकारी संस्था या सोसायट्यांमार्फत जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्जाची उचल करीत असतात. हे कर्ज उचलत असताना कर्जाऊ रकमेतून जिल्हा मध्यवर्ती बँक पीक विम्याचा प्रती एकरी ३५० रुपये हप्ता कपात करून विमा कंपनीकडे हप्त्याची रक्कम जमा करीत असते. अशीच पद्धत इतर राष्ट्रीयीकृत बँकाही अवलंबत असतात. जिल्हा मध्यवर्ती बँकेचाच विचार करता ही बँक दरवर्षी सहा ते सात हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देत असल्याची माहिती आहे. काही शेतकरी वैयक्तिकरीत्याही आपल्या शेतीचा पीक विमा काढत असतात, असेही शेतकरी शेकडोच्या घरांत आहेत.

गत हंगामात नागभीड तालुक्यात धानावर अगोदर परतीच्या पावसाने आणि नंतर मावा, तुडतुडा, करपा यासारख्या विविध रोगांनी धान पीक पार नेस्तनाबूत केले. मळणीनंतर दर एकरी पाच-सहा पोती उत्पन्न शेतकऱ्यांच्या हातात आले होते. या उत्पन्नाने शेतकरी पार हादरून गेले होते. म्हणूनच शेतकऱ्यांकडून पीक विम्याची मागणी करण्यात येत होती. आता नुकतीच या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम टाकणे सुरू केले आहे. तालुक्यांतर्गत येनोली येथील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम आली आहे. ही रक्कम बघून शेतकऱ्यांच्या अंगाचा तिळपापड होत आहे.

कोट

येनोली येथे शेतकऱ्यांच्या खात्यांवर विमा कंपन्यांनी केवळ एक हजार रुपये जमा केले आहेत. ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टाच नाही तर विमा कंपनीने ही रक्कम जमा करून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळले आहे. त्यापेक्षा ही रक्कम दिली नसती तरी बरे झाले असते.

- अमोल बावणकर, सरपंच येनोली