शहरं
Join us  
Trending Stories
1
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा उमेदवाराच्या कारवर हल्ला
3
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
4
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, फोडल्या काचा
5
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
6
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
7
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
8
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
9
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
10
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
11
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
12
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
13
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
14
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
15
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
16
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
17
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
18
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
19
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
20
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाने मोडला शेतकऱ्यांचा कणा

By admin | Updated: March 11, 2015 00:59 IST

अपूरे पर्जन्यमान, नापिकी व सिंचनाच्या सोयी अभावी पहाडावरील शेतकरी दुष्काळाच्या चक्रात अडकला आहे. कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळाने ...

जिवती : अपूरे पर्जन्यमान, नापिकी व सिंचनाच्या सोयी अभावी पहाडावरील शेतकरी दुष्काळाच्या चक्रात अडकला आहे. कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळाने पहाडावरील शेतकऱ्यांचा कणाच मोडला जात असल्याचा चित्र सध्या बघायला मिळत आहे.खरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने उत्पनात घट्ट झाली. झालेला खर्च निघाला नाही, असे अस्मानी संकट कोसळल्यावरही शासनाने शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव दिला नाही. दुष्काळाच्या चक्रव्यवहातून सावरण्यासाठी थोडीफार सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी रबीची लागवड केली. पिकही जोमात आले. मात्र ऐनवेळी अवकाळी पाऊस झाल्याने हाती आलेल्या पिकाची नासाडी झाली. जिवती तालुका व मागास तालुका म्हणून ओळखला जात असून तालुक्यातील संपूर्ण शेती खडकाची आहे. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. सिंचनाची सोय नसल्याने निसर्गाच्या भरवश्यावर कोरडवाहू शेती करणे हा त्यांचा हातभट्यांचा व्यवसायच असल्यासारखे आहे. पिकेल तर शेती नाही तर मातीच आहे. दिवसभर शेतात राबराब करुन सुद्धा पाहिजे तेवढे उत्पन्न घेता येत नाही. पिकले तरी विकले जात नाही. निसर्गाचा दगा त्यात शासनाकडून शेतमालाला हमी भाव नाही. यामुळे पहाडावरील शेतकऱ्यांवर आस्मानी संकटच कोसळले आहे. खरीप हंगाम गेल्यानंतर रबी हंगामात तरी सावरता येईल, अशी आशा मनात घेवून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा अवकाळी पावसाने चुराडा केला. डोळ्यादेखत त्यांची स्वप्ने गोठली गेली. त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकरी वर्गाच्या मनात शेती व्यवसायाबद्दल उदासिनता निर्माण झाली आहे. निसर्गाच्या भरवश्यावर काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चाचा ताळमेळ आणि त्याला मिळणारा मोबदला याचे गणित कधीच जमले नाही. सावकारी कर्ज, बँक कर्ज घेवून मायभूमीला सजविणाऱ्या शेतकऱ्याला निसर्गाने हतबल केले आहे. शासनाने दृष्काळग्रस्त मदत जाहीर केली. मात्र तेही दु:खावर मलमपट्टी केल्यासारखीच आहे. बहुतांश शेतकऱ्यांना तर जमिनीचा मालकी हक्कच नसल्याने त्याचा फायदाही घेत येत नाही. (तालुका प्रतिनिधी)