शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसकडून शेतकरी, कामगार विधेयकाचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 05:00 IST

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणाच्या तीव्र शब्दात विरोध केला. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना धक्काबुक्की करणे ही उत्तर प्रदेश सरकारची मुजोरीची आहे. कृषी विधयके देशातील शेतकऱ्यांना मातीत घालणारी असल्याने शेतकऱ्यांना याचा प्रखर विरोध करावा, असे आवाहन यावेळी केले. खासदार बाळू धानोरकर यांनी केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध करत मोदी सरकारने राज्यसभेत पारित न होणारे विधेयक सहा खासदारांना निलंबित करून डाव साधल्याचा आरोप यावेळी केला आहे.

ठळक मुद्देचंद्रपुरात धरणे : राहुल गांधींना धक्काबुक्की केल्याने निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : केंद्र सरकारने मंजूर केलेले विधेयक शेतकरी व कामगारांच्या मुळावर उठणारे असल्याचा आरोप करून काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी महात्मा गांधी जयंतीदिनी चंद्रपूर, वरोरा, राजुरा, ब्रह्मपुरी, गोंडपिपरी येथे आंदोलनाद्वारे निषेध नोंदविण्यात आला. हाथरस येथील महिला अत्याचार व काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी व प्रियं, का गांधी यांना धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. ब्रह्मपुरीत टायरची जाळपोळ करून निषेध नोंदविण्यात आला.चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी व जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीतर्फे गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री विजय वड्डेटीवार, खासदार बाळू धानोरकर, ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक किशोर गजभिये, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी, ग्रामीण काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश देवतळे, विनोद दत्तात्रय, युसूफ भाई, के. के. सिंग, हारून भाई, मलक शाकीर, महाराष्ट अनुसूचित जाती उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, ओ. बी. सी जिल्हाध्यक्ष उमाकांत धांडे, महिला काँग्रेस शहर अध्यक्ष सुनीता अग्रवाल, किसान कॉंग्रेस अध्यक्ष रोशन पचारे, भालचंद्र दानव, नगरसेवक निलेश खोब्रागडे, नगरसेवक नंदू नागरकर, नगरसेविका सुनीता लोढिया आदी उपस्थित होते.कृषी विधेयके शेतकऱ्यांना मातीत घालणारीपालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणाच्या तीव्र शब्दात विरोध केला. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना धक्काबुक्की करणे ही उत्तर प्रदेश सरकारची मुजोरीची आहे. कृषी विधयके देशातील शेतकऱ्यांना मातीत घालणारी असल्याने शेतकऱ्यांना याचा प्रखर विरोध करावा, असे आवाहन यावेळी केले. खासदार बाळू धानोरकर यांनी केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध करत मोदी सरकारने राज्यसभेत पारित न होणारे विधेयक सहा खासदारांना निलंबित करून डाव साधल्याचा आरोप यावेळी केला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसFarmerशेतकरी