शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची धुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तांदूळ, गहु, ज्वारी, हरभरा, जवस पिकांचे उत्पादन घेण्यात येते. सर्व पीक हातात येणाच्या तयारीत असताना मागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकºयांच्या सोयाबिनला कोंब फुटले तर काहींचे सोयाबिन काळे पडले.

ठळक मुद्देमशागतीसह पेरणीला सुरुवात : पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. सद्या चंद्रपूर जिल्ह्यात रब्बी हंगामास सुरुवात झाली आहे. आता याच हंगामावर शेतकऱ्यांची धुरा अंवलबून आहे. खरीप हंगामात शेतकºयांचे आर्थिक गणित बिघडल्याने शेतकऱ्यांना पैसा गोळा करताना कसरत करावी लागत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तांदूळ, गहु, ज्वारी, हरभरा, जवस पिकांचे उत्पादन घेण्यात येते. सर्व पीक हातात येणाच्या तयारीत असताना मागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकºयांच्या सोयाबिनला कोंब फुटले तर काहींचे सोयाबिन काळे पडले. शेतकऱ्यांचे पुढील नियोजन हे खरीप पिकांच्या उत्पादनावर असते. मात्र नगदी पिके समजल्या जाणाऱ्यां सोयाबीन, ज्वारी, कापूस पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन फसले. त्यातच सध्या रब्बी हंगामास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांची रब्बी पेरणीसाठी लगबग सुरु झाली आहे. जिल्ह्याती शेकडो शेतशिवारात रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकाच्या पेरणीसाठी पेरणीपूर्वी मशागतीला वेग आला आहे. शेतीसाठी बियाणे, खते विकत घेण्याचीसुद्धा लगबग सुरु झाली. शेती मशागतीपासून तर बियाण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकºयांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेली मदत तातडीने देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.अनुदानावर बियाणे देण्याची मागणीखरीप हंगामातील नुकसानामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे बियाणे घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडे पैसाच नसल्याचे चित्र आहे. पैशांअभावी अनेक शेतकऱ्यांची जमीन पडीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने रब्बी हंगामासाठी शंभर टक्के अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.बँकांकडून पीककर्ज देण्यास टाळाटाळरब्बी हंगामाच्या मशागतीची कामे अंतिम टप्यात आली असून पेरणी वेळेवर करण्यासाठी शेतकºयांनी खत, बियाण्याची जुळवाजुळव सुरु केली आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा फटका बसल्याने त्यांच्याकडे रब्बी हंगामासाठी पैसे उरले नाहीत. बँकेच्या दारात गेले असता बँकांकडूनही पीककर्ज देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे पेरणीसाठी बि-बियाण्याची जमवाजमव कशी करावी, याचीही अनेक शेतकºयांना चिंता सतावत आहे.

टॅग्स :agricultureशेती