Farmers are encouraged by the Vedictive and Dhoot | वडेट्टीवार व धोटेंंकडून शेतकऱ्यांना धीर
वडेट्टीवार व धोटेंंकडून शेतकऱ्यांना धीर

ठळक मुद्देशेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात परतीचा पाऊस पडल्याने शेकडो हेक्टर पिकांचे नुकसान झाले. खरीप हंगामातील लागवडीचा खर्च निघेल की नाही, या प्रश्नाने अनेक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पिकांचे तातडीने सर्वेक्षण व्हावे आणि नुकसान भरपाई मिळावी, याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. दरम्यान, मंगळवारी ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार, राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. पिकांची पाहणी करून आश्वस्त केले.
शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या
सिंदेवाही : अवकाळी पावसाने तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना जोरदार फटका बसला. कापणी केलेले पुंजणे कुजल्याने हवालदिल झालेल्या रामाळा, रत्नापूर व नवरगाव परिसरातील भातशेतीची आमदार विजय वडेट्टीवार यांनी पाहणी केली.
या तालुक्याला धान्याचे कोठार म्हणून ओळखल्या जाते. परंतु पावसाने प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून तातडीने भरपाई देण्याची मागणी आमदार वडेट्टीवार यांनी केली. मनोज साखरकर, नामदेव शेडे (रामाळा) मेघश्याम चनफणे, रामदास तोडफोडे (रत्नापूर) अरूण गुणशेटीवार खैरी, श्रीराम गहाणे, शेखर गहाणे (नवरगाव) आदी शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान झाले. आमदार वडेट्टीवार यांनी बांधावर जाऊन व्यथा जाणून घेतल्या. यावेळी तहसीलदार पाठक, बीडीओ इलुरवार, कृषी अधिकारी किशोर चौधरी, सहाय्यक कृषी अधिकारी संजय कांबळे, तलाठी, ग्रामसेवक, सरपंचांची उपस्थिती होती.

Web Title:  Farmers are encouraged by the Vedictive and Dhoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.