शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेततळे योजनेसाठी प्रशासन शेतकऱ्यांच्या दारात

By admin | Updated: April 10, 2016 00:51 IST

राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारी ...

आॅनलाईन प्रक्रियेमुळे उद्दिष्ट गौण : मागेल त्याला शेततळे योजनेतील वास्तवबल्लारपूर : राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारी व शेती उत्पादनात वाढ करणारी महत्त्वकांशी योजना म्हणून २९ फेब्रुवारीपासून सुरू झाली. मात्र आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी किचकट ठरली. परिणामी तालुका निहाय शेततळ्यांचे उद्दीष्ट अद्यापही पूर्णत्वास जाऊ शकले नाही. आता तर प्रशासन शेततळ्यांचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या दारात जात असल्याचे वास्तव बल्लारपूर तालुक्यात दिसून येत आहे.बल्लारपूर तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायती आहेत. ६ हजारांवर शेतकरी संख्या असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचे उद्दीष्ट १४५ देण्यात आले. मात्र आॅनलाईन शेततळे नोंदणी प्रक्रियेमुळे केवळ ४० शेतकऱ्यांनी आजतागायत नोंद केल्याने योजना कमकुवत ठरण्याच्या मार्गावर आली. शेतकऱ्यांना आॅनलॉईन नोंदणी प्रक्रिया न समजणारी व वेळखाऊ वाटल्याने सदर योजनेकडे दुर्लक्ष केले. शेततळे योजनेतील ठरविण्यात आलेले उद्दीष्ट गौण ठरले. यामुळे तालुका प्रशासन खडबडून जागे झाले.‘मागेल त्याला शेततळे’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व तालुक्यात उद्दीष्टपूर्ती साध्य करण्यासाठी शनिवारी सकाळी ८ वाजता विसापूर ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शेतकऱ्यांची सभा घेण्यात आली. यावेळी बल्लारपूरचे तहसिलदार विकास अहीर, सरपंच रिता जिलटे, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम, तालुका कृषी अधिकारी प्रशांत कसराळे, कृषी विस्तार अधिकरी एम.एम.वरभे, कृषी सहायक ए.आर. फटींग, प्रशांत गजभिये, ग्रामविकास अधिकारी मोरेश्वर कोमटी यांनी सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेततळे योजनेची माहिती दिली.शेततळे योजनेत दारिद्र्य रेषेखालील शेतकरी, कुटुंबातील आत्महत्या ग्रस्त शेतकरी व ज्या शेतकऱ्यांकडे ०.६० हेक्टर क्षेत्रापेक्षा कमी शेत जमीन क्षेत्र नसलेल्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. शेततळाची तांत्रिक तपासणी तालुका कृषी विभाग करणार असून निधीची उपलब्धता शेततळे बांधकाम झाल्याबरोबर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे धोरण आहे. सात प्रकारात शेततळ्यांचे बांधकाम करावाचे असून त्यासाठी २६ हजार २०६ रुपयापासून ५० हजार रुपये अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. विसापूर, नांदगाव (पोडे), हडस्ती येथील गावागावात शेततळे योजनेची माहिती देण्यात आली. (शहर प्रतिनिधी)