शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये दुर्बल घटक वंचितच

By admin | Updated: August 1, 2014 00:12 IST

महाराष्ट्र शासनाने खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २०१४ च्या शैक्षणिक सत्रात दुर्बल आणि वंचित घटकांकरिता २५ टक्के प्रवेश आरक्षण घोषित केले व त्यानुसार संबंधित शाळांना, शाळेच्या दर्शनी भागावर

बल्लारपूर : महाराष्ट्र शासनाने खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २०१४ च्या शैक्षणिक सत्रात दुर्बल आणि वंचित घटकांकरिता २५ टक्के प्रवेश आरक्षण घोषित केले व त्यानुसार संबंधित शाळांना, शाळेच्या दर्शनी भागावर सूचना फलक लावून विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, काही शाळा या शासकीय आदेशाची अवहेलना करुन दुर्बल आणि वंचित घटकांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे आढळून येत आहे.बल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत एकूण २२ इंग्रजी कॉन्व्हेंट असून त्यापैकी सहा या अल्पसंख्यांक मान्यता प्राप्त आहेत. यापैकी रेड रोज कान्व्हेंट, आयडियल इंग्लीश स्कूल, विद्याश्री कान्व्हेंट, बल्लारपूर पब्लिक स्कूल येनबोडी या चारच शाळांनी सदर प्रवेशा संबंधीच्या सूचना फलक आपल्या शाळेत लावले आहेत. शाळात नर्सरी ते पहिल्या वर्गात २५ टक्के राखीव तरतुदीनुसार प्रवेशासाठी एकूण १७४ जागा उपलब्ध असताना फक्त ७१ विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात आला.१०३ जागा अजूनही रिकाम्या आहेत. प्रत्येक शाळेत वंचित व दुर्बल घटकाचे विद्यार्थी आहेत. त्यामुळे, या जागा भरणे सहज शक्य आहे. मात्र, इंग्रजी माध्यमाच्या काही शाळा त्या जागा स्वार्थापायी भरत नाहीत. ते शासनाची दिशाभूल करीत आहे. अशा शाळांवर कारवाई करावी, अशी मागणी बल्लारपूर आपच्या नेतृत्वात येथील नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकारी संजय हेडाऊ यांना निवेदनातून केली आहे. तसे न केल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही या दिला आहे.शिष्टमंडळात परमजित सिंग झगडे, स्वामी रायबरन, बशीर खान, समशेर सिंह चव्हाण सुनिता कावडे, पत्रू समर्थ आदींचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)