शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणद्वारा ऊर्जासंवर्धन आठवडा

By admin | Updated: December 19, 2015 00:49 IST

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातील विविध कार्यालयात १४ डिसेंबर ते २० डिसेंबरदरम्यान उर्जा संवर्धन सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातील विविध कार्यालयात १४ डिसेंबर ते २० डिसेंबरदरम्यान उर्जा संवर्धन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने महावितरणच्या परिमंडळ कार्यालयात उर्जा संवर्धनाची प्रतिज्ञा घेण्यात आली. याप्रसंगी चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अंकुश नळे यांच्यासोबत चंद्रपूर मंडळाचे अधिक्षक अभियंता हरिष गजबे, विभागाच्या कार्यकारी अभियंता अर्चना घोडेस्वार व सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही प्रतिज्ञा केली.उर्जा संवर्धन कार्यक्रमाचा भाग म्हणून वीज बचतीसाठी एलईडी दिव्यांची विक्री सुरू असून आतापर्यंत महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात येणाऱ्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात २ लाख ५३ हजार एलईडी दिव्यांची विक्री झाली आहे.महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात येणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात ७ डिसेंबरपासून विविध ठिकाणी स्टॉल्स लावून या एलईडी दिव्यांची विक्री सुरू केली आहे. या योजनेला ग्राहकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत या दोन जिल्ह्यात सुमारे १२ हजार ५२२ हजार एलईडी दिव्यांची विक्री झाली आहे. वीज व पैशाची बचत करत गडचिरोली जिल्ह्यातील ग्राहकांनी या योजनेस चांगला प्रतिसाद दिला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ही योजना २६ आॅक्टोबरपासूनच सुरू झाली आहे.चंद्रपूर मंडळातील ३ लाख ११ हजार, गडचिरोली मंडळातील २ लाख ३८ असे चंद्रपूर परिमंडळात एकुण ५ लाख ४९ घरगुती वीज ग्राहक आहेत. या भागात ४२ लाख ५५ हजार एलईडी दिव्यांचे वितरण करण्याचे उद्दिष्ट आहे तर राज्यात एकुण ७ कोटी बल्बचे वाटप करावयाचे आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात ५८ लाख ४३ हजार एलईडी दिव्यांची विक्री झाली असून विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात २ लाख ४१ हजार एलईडी दिव्यांची विक्री झाली आहे. या एलईडी दिव्यांच्या वापराने वीज बचतीसोबतच पैशाची बचत होण्यास मदत होत आहे. (शहर प्रतिनिधी)