शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएमच्या विश्वासार्र्हतेसाठी निवडणूक विभागाची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 06:00 IST

लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून देशपातळीवर ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर विरोधी पक्षांकडून संशय व्यक्त केला जात आहे. एवढेच नाही तर निवडणूक आयोगाकडे मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली. मात्र निवडणूक विभागाने कोणत्याही परिस्थितीत मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेणार नसल्याचे ठामपणे सांगितले आणि ही मागणी मागे पडली.

ठळक मुद्देएसडीओंना प्रत्येकी पाच मशीन: २०७० केंद्रावर जनजागृती सुरू

साईनाथ कुचनकार ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशपातळीवर विरोधी पक्षांकडून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यासाठी विविध आंदोलनाचे हत्यारही उपसल्या गेले. असे असले तरी विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांमध्ये संभ्रम राहू नये यासाठी चंद्रपूर जिल्हा निवडणूक विभागाद्वारे जिल्ह्यातील २ हजार ७० मतदार केंद्रावर थेट इव्हीएमद्वारे मतदारांना प्रात्याक्षिक करून दाखविल्या जात आहे. सोबतच विविध चौकांमध्येही मोठ्या प्रमाणात फ्लॅक्स लावण्यात आले आहे.लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून देशपातळीवर ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर विरोधी पक्षांकडून संशय व्यक्त केला जात आहे. एवढेच नाही तर निवडणूक आयोगाकडे मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली. मात्र निवडणूक विभागाने कोणत्याही परिस्थितीत मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेणार नसल्याचे ठामपणे सांगितले आणि ही मागणी मागे पडली. त्यानंतर लोकसभा निवडणूक पार पडली. मात्र सत्ताधारी पक्षांना मिळालेल्या बहुमतामुळे पुन्हा विरोधी पक्षांकडून मोर्चेबांधणी करून ईव्हीएमवर संशय व्यक्त करीत बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. या मागणीमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून मतदार गोंधळात पडले आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने ईव्हीएमची जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाभरातील २०७० केंद्रावर ही मोहीम सुरू केली आहे. यासाठी प्रत्येक एसडीओंना पाच ईव्हीएम, व्हीव्हीपॅट पुरविण्यात आले आहे. याद्वारे प्रत्येक केंद्रात पथकाद्वारे मतदारांकडून डमी मतदान करून घेतल्या जात असून त्यांच्यासमोरच मतमोजणीही करून घेतली जात आहे. या माध्यमातून विश्वासार्हता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे.विविध पथकांद्वारे प्रत्येक विधानसभानिहाय मतदारांमध्ये जनजागृती मोहीम आरंभण्यात आली आहे. या माध्यमातून मतदारांचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. डमी मतदान घेऊन मतदानाची मोजणी सुद्धा करून दाखविण्यात येत आहे.- संपत खलाटे उपजिल्हाधिकारी(निवडणूक), चंद्रपूर

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीन