शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

ई-लर्निंग लोकार्पण सोहळा

By admin | Updated: April 7, 2016 00:41 IST

जिल्हा परिषद शाळा नंदोरी येथे ई-लर्निंग लोकार्पण सोहळा व शैक्षणिक साहित्य जत्रा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नंदोरी : जिल्हा परिषद शाळा नंदोरी येथे ई-लर्निंग लोकार्पण सोहळा व शैक्षणिक साहित्य जत्रा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.लोकसहभागातून एक लाख रुपयांचा निधी गावकरी व दात्यांनी शाळेकरिता समर्पित केला आहे. पहिल्या टप्प्यात एका संचाची व्यवस्था केली असून वाढीव संचाबरोबरच आयएसओ पातळी गाठायची आहे, असा मनोदय व्यक्त करण्यात आला. ई-लर्निंगच्या शुभारंभासोबतच शैक्षणिक साहित्य जत्रेचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी रंगनाथ स्वामी पतसंस्था वरोराचे संचालक परीक्षित एकरे, भाजपा तालुका महामंत्री नरेंद्र जीवतोडे, जिल्हा परिषद सदस्य अर्चना जीेवतोडे, सरपंच अनुराधा पिंपळकर, उपसरपंच भानुदास ढवस, शाळा सुधार व्यवस्थापन कमेटी अध्यक्ष नीता कुळसंगे, शाळा सुधार व्यवस्थापन कमेटी सदस्य पंढरी एकरे, मंगेश भोयर, ग्राम विकास अधिकारी अजय कटाईत, दीपक वैरागडे तथा सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सुमधूर स्वागतगीतानंतर दीप प्रज्वलन करीत जिल्हा परिषद सदस्य अर्चना जीवतोडे यांनी ई-लर्निंगचे उद्घाटन केले. शैक्षणिक साहित्य जत्रा या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या. प्राणी व त्यांचे उपयोग, उद्योग व शैक्षणिक साहित्य तसेच लोककलेचे प्रतीक असलेले तुणतुणे तयार करण्यात आले होते. काळात ओघात पडद्याआड जाणाऱ्या लोककलेला सजीवपणा आलेला होता. धान्य दुकान, गणितीय मापे, क्रमवार लावलेल्या टाकाऊ प्लेटस व त्यावरील क्रमवार असणारे महिने, शिंपले व सजविलेली काटेरी झुडपे, अशी एक ना अनेक कल्पकता शैक्षणिक जत्रेत विद्यार्थ्यांनी साकारली होती. दरम्यान, परीक्षित एकरे, अर्चना जीवतोडे, नरेंद्र जीवतोडे आदी दात्यांचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. तसेच असे उपक्रम राबविल्यास मागे पडणार नाही. तसेच मराठी शाळा सदा अग्रेसर राहील, अशी ग्वाही परीक्षित एकरे यांनी आपल्या वक्तव्यातून दिली. तर, ई-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी संधीचे सोन करावे याबाबत सरपंच अनुराधा पिंपळकर यांनी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)