शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धेत एकलव्य कॉन्व्हेंट प्रथम

By admin | Updated: January 11, 2016 01:01 IST

लोकमत युवा नेक्स्ट व स्वतंत्र साई माऊली बहुउद्देशिय संस्था आवारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ....

लोकमत युवा नेक्स्ट व स्वतंत्र साई माऊली संस्थेचे आयोजन : बहारदार नृत्याने आवारपूरकर मंत्रमुग्ध, व्हॉलीबॉल स्पर्धेचेही उद्घाटनगडचांदूर : लोकमत युवा नेक्स्ट व स्वतंत्र साई माऊली बहुउद्देशिय संस्था आवारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी आवारपुरात जिल्हास्तरीय समूह नृत्य व एकल नृत्य स्पर्धा पार पडल्या. जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धेत एकलव्य इंग्लिश मिडीयम स्कूल बिबीने प्रथम क्रमांक पटकाविला, तर एकल नृत्य स्पर्धेत खुशी ठाकूर हिने प्रथम क्रमांक पटकाविला. यावेळी सदर झालेल्या बहारदार नृत्यांनी आवारपूरवासी मंत्रमुग्ध झाले.आवारपूर येथील शास्त्रीनगर परिसरातील ग्रामपंचायतीच्या क्रीडा संकुलावर पार पडलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन सायंकाळी ८ वाजता गडचांदूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या हस्ते पार पडले. मार्गदर्शक म्हणून गडचांदूरचे उपनगराध्यक्ष सचिन भोयर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आवारपूरच्या सरपंच सिंधू परचाके उपस्थित होत्या. स्वागताध्यक्ष म्हणून प्राचार्य अनिल मुसळे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच अविनाश चौधरी, लोकमतचे गशहर प्रतिनिधी आशिष देरकर, पुरुषोत्तम निब्रड, यशवंत मुसळे, पाचभाई गुरुजी, परचाके, येलेकर, रवी बंडीवार, सचिन आस्वले आदि मान्यवर उपस्थित होते.जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक जे.एम.डी. ग्रुप राजुरा यांनी तर तृतिय क्रमांक माउंट पब्लिक स्कूल नांदाफाटा यांनी पटकाविला, तर एकलनृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक धनराज आंबिलधगले यांनी तर तृतिय क्रमांक धनश्री पंचबुद्धे हिने पटकावला. स्पर्धेचे परीक्षण सचिन गोंगले व सचिन गौरकार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन पूनम बल्की व नितेश शेंडें यांनी तर आभार लीना कुसराम हिने मानले.व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन दुपारी १ वाजता प्राचार्य अनिल मुसळे यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी आवारपूरचे उपसरपंच अविनाश चौधरी उपस्थित होते. स्वागताध्यक्ष म्हणून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आत्माराम वानखेडे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून सिद्धार्थ वानखेडे, लटारी ताजने, प्रकाश बोरकर, गोहोकर महाराज, राहुल बोढे, ग्रा.वि.अ. ताजने, बंडू कवाडे, विठ्ठल डाहुले, सुरेश टेकाम, दर्शन बदरे, शशिकांत दिवे उपस्थित होते.यशस्वितेकरिता लोकमत युवा नेक्स्टचे तालुका संयोजक प्रा. आशिष देरकर, मंडळाचे सदस्य नितेश शेंडे, राजु वादेकर, राकेश चौधरी, मारोती झुंगरे, प्रशांत कांबळे यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)