अहवाल येण्याआधीच आठ जणांना ठेवले कोवीड सेंटरमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 05:00 AM2020-09-27T05:00:00+5:302020-09-27T05:00:34+5:30

शहरातील जुना रेल्वे स्टेशन परिसरातील एका महिलेचा अहवाल दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कुटुंबासह इतर संपर्कात आलेल्या आठ व्यक्तींचे गुरूवारी स्वॅब घेण्यात आले. तपासणी अहवाल येण्यापूर्वीच स्थानिक प्रशासनाने शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान सहा जणांचे गृह विलगीकरण केले तर संपर्कातील दोन महिलांना येथील कोविड केअर सेंटरमध्ये दुपारी ४ वाजतापासून ठेवण्यात आले.

Eight people were kept at the Covid Center before the report arrived | अहवाल येण्याआधीच आठ जणांना ठेवले कोवीड सेंटरमध्ये

अहवाल येण्याआधीच आठ जणांना ठेवले कोवीड सेंटरमध्ये

Next
ठळक मुद्देसंतापजनक । नगर परिषद प्रशासनाचा प्रताप

भोजराज गोवर्धन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : कोरोना पॉझिटिव्ह अहवाल येण्याआधीच आठ जणांना बाधित ठरवून कोविड केअर सेंटरमध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी शहरात उघडकीस आला. या घटनेमुळे नागरिक नगर परिषद प्रशासनाविरूद्ध तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
शहरातील जुना रेल्वे स्टेशन परिसरातील एका महिलेचा अहवाल दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कुटुंबासह इतर संपर्कात आलेल्या आठ व्यक्तींचे गुरूवारी स्वॅब घेण्यात आले. तपासणी अहवाल येण्यापूर्वीच स्थानिक प्रशासनाने शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान सहा जणांचे गृह विलगीकरण केले तर संपर्कातील दोन महिलांना येथील कोविड केअर सेंटरमध्ये दुपारी ४ वाजतापासून ठेवण्यात आले. ज्या महिलांना भाग्यरेखा सभागृहातील कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले तिथेच काही बाधित महिला होत्या. त्यामुळे निरोगी महिला बाधित होण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे. निगेटिव्ह अहवाल आलेल्या महिलांना शनिवारी सकाळी प्रशासनाने घरी सोडून दिले. तालुक्यात आरटीपीसीआर व अ‍ॅन्टिजेन तपासणी केंद्र आहे. अ‍ॅन्टिजेन तपासणी अहवाल १० मिनिटात मिळतो. आरटीपीसीआर अहवाल केव्हा मिळणार हे एसएमएस किंवा अधिकाऱ्यांमार्फत सांगितले जाते. त्यामुळे अहवाल येण्यापूर्वीच महिलांना बाधित ठरविण्याचे कारण काय, असा प्रश्न कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.

अहवाल येण्यापूर्वी महिलांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले. यामध्ये प्रशासनाचीच चूक आहे. या त्रासाबद्दल दिलगीरी व्यक्त करतो. यापुढे अशा चुका न करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.
-सिद्धार्थ मेश्राम, मुख्याधिकारी नगर परिषद, मूल

Web Title: Eight people were kept at the Covid Center before the report arrived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.