बंदुकीसह आठ हातबॉम्ब जप्त

By Admin | Updated: December 10, 2014 22:54 IST2014-12-10T22:54:11+5:302014-12-10T22:54:11+5:30

भिसी येथील एफडीसीएमच्या जंगलात काल मंगळवारी शिकारी साहित्यासह दुचाकी जप्त करण्यात आली होती. या प्रकरणात त्याच दिवशी एक आरोपी तर आज बुधवारी आणखी एका आरोपीला

Eight grenades with gunshot seized | बंदुकीसह आठ हातबॉम्ब जप्त

बंदुकीसह आठ हातबॉम्ब जप्त

एक आरोपी फरारच : शिकारी टोळीतील आणखी एकाला अटक
शंकरपूर : भिसी येथील एफडीसीएमच्या जंगलात काल मंगळवारी शिकारी साहित्यासह दुचाकी जप्त करण्यात आली होती. या प्रकरणात त्याच दिवशी एक आरोपी तर आज बुधवारी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली. यात आठ हातबॉम्ब जप्त करण्यात आले.
मंगळवारी वनविभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या मोहनजुंगी जुन्नी याच्या बयाणावरुन दोन दुचाकी घेऊन ते भिसी परिसरात शिकार करण्यासाठी गेले होते. तिथे रानडुकराची बंदुकीने शिकार केली होती. परंतु वनविभागाचे कर्मचारी आल्याने आरोपी तिथून पळून गेले. बुधवारी मोहनजुंगी जुन्नीला सोबत घेऊन त्या भागात सर्च अभियान राबविले असता आठ गावठी हात बाम सापडले. शिकार करण्यासाठी गणेश शिंदेवार (४०) रा. जांभुळघाट व वडील तिरथसिंग जुन्नी सोबत होते. या माहितीवरून गणेश शिंदेवार यालाही अटक करण्यात आली.
आरोपीच्या घरुन जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये बारुद, बॅटरीज, दोन चाकू, दोन मोठे चाकू, बंदुकीचे २१ काडतूस, रानमांजराचे व पक्ष्यांचे नखे, दोन रानडुकराचे पाय, एक भेडकीचे कान आदी साहित्य जप्त करण्यात आले. तसेच शिकारीसाठी वापरण्यात आलेल्या दोन दुचाकाही जप्त करण्यात आल्या. यातील तिसरा आरोपी तिरथसिंग फरार आहे. अधिक तपास उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक पंधे, वनपरिक्षेत्र अधिकारी चौधरी, आक्केवार, वनपाल मललेवार, धुर्वे आदी करीत आहे. (वार्ताहर)

Web Title: Eight grenades with gunshot seized