शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा खाणीसाठी संपादित जमिनीला सुधारित दराने मोबदला मिळणार

By admin | Updated: July 10, 2014 23:30 IST

राजुरा तालुक्यातील सास्ती, गोवरी परिसरात वेकोलिने अधिग्रहित केलेल्या ३०.९.२०११ पर्यंत अंतिम अधिसूचना झालेल्या १३३ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सुधारित दराप्रमाणे मोबदला मिळण्याचा मार्ग

राजुरा : राजुरा तालुक्यातील सास्ती, गोवरी परिसरात वेकोलिने अधिग्रहित केलेल्या ३०.९.२०११ पर्यंत अंतिम अधिसूचना झालेल्या १३३ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सुधारित दराप्रमाणे मोबदला मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्य शासनाच्या २२ आॅगस्ट २०१२ च्या शासन निर्णयानुसार सुधारित दराप्रमाणे मोबदला मिळण्याचा हा मार्ग राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे यांच्या पुढाकाराने मोकळा झाला आहे. परिसरातील जवळपास १३३ शेतकऱ्यांना या निर्णयामुळे फाभ होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे सास्ती, गोवरी, पोवनी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. कोळसा खाणीसाठी सुधारित दराने मोबदला मिळावा, यासाठी आमदार सुभाष धोटे यांनी २०१२ पासून शासनाकडे पाठपुरावा चालविला होता. अलिकडेच प्रधान सचिव (वने) प्रविण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मंत्रालयात ७ जुलैला बैठक पार पडली. यात आ. सुभाष धोटे यांच्यासह भूसंपादन अधिकारी तथा गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी चंद्रभान पराते यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. आ. धोटे यांनी शेतकऱ्यांची बाजू परदेशी यांना पटवून दिली. विषयाची गंभीरता लक्षात घेऊन प्रविण परदेशी यांनी जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर आणि वेकोलि नागपूर मुख्य महाप्रबंधक कार्यालयातील निर्देशक (तांत्रिक) ओमप्रकाश यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरसच्या माध्यमातून चर्चा केली. उपसचिव भूसंपादन महसूल व वनविभाग यांच्याशीही या बैठकीत चर्चा होऊन मुद्दा निकाली काढण्यात आला. ३० सप्टेंबर २०११ ला निर्गमित झालेल्या अंतिम अधिसूचनेचा आधार घेऊन १३३ प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना २२ आॅगस्ट २०१२ च्या नवीन कायद्यानुसार नवीन सुधारित दराने मोबदला देण्याचे निर्देश वेकोलि अधिकाऱ्यांना देण्यात आले. वेकोलिने वाढीव दरासंदर्भात सहमती दर्शविली आहे. मुंबईतील बैठकीत सास्ती येथील शेतकरी वसंत चन्ने, सुरेश लांडे, राजेश्वर लांडे, बळीराम लांडे, बाळू रोगे, निखील सालवटकर, पुरुषोत्तम शेंडे, सुरेश लांडे, रमेश लांडे आदी उपस्थित होते.