किडनी रॅकेटचा तपास आता 'ईडी' करणार; डॉक्टरांचे आर्थिक व्यवहार आणि व्हॉट्सॲप चॅटिंग घेतले ताब्यात
By परिमल डोहणे | Updated: March 5, 2026 14:06 IST2026-03-05T14:05:19+5:302026-03-05T14:06:07+5:30
Chandrapur : डॉ. रवींद्र पाल सिंग याने उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे. २२ जानेवारी २०२६ पासून त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असून, ४ मार्चपर्यंत तब्बल ११ वेळा सुनावणी झाली आहे.

ED will now investigate kidney racket; Doctor's financial transactions and WhatsApp chats seized
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : माजविणाऱ्या किडनी रॅकेट प्रकरणाचा : राज्यभर खळबळ तपास आता नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी डॉ. रवींद्रपाल सिंग आणि डॉ. राजरत्न गोविंदसामी यांच्यातील आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे आणि धक्कादायक व्हॉट्सअॅप चॅटिंग सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ताब्यात घेतली आहे. या पुराव्यांच्या आधारे आता दोन्ही डॉक्टरांवर 'मनी लाँड्रिंग'चा (अवैध मुद्रा विनिमय) गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तविली आहे.
नागभीड येथील रोशन कुळे किडनी शस्त्रक्रिया प्रकरणाच्या तपासात त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पिटलचे कनेक्शन समोर आले होते. डॉ. रवींद्रपाल सिंग आणि डॉ. गोविंदसामी हे दोघे संगनमताने या शस्त्रक्रिया पार पाडत असत. एका शस्त्रक्रियेसाठी रुग्णांकडून लाखो रुपये उकळले जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. या गुन्ह्याचा समांतर तपास करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखा आणि विशेष तपास पथकाने (एसआयटी) संकलित केलेले महत्त्वाचे पुरावे 'ईडी'ने मागविले होते.
नुकतीच ही सर्व कागदपत्रे 'ईडी'च्या स्वाधीन करण्यात आली असून, त्यामध्ये आरोपींच्या व्हॉट्सअॅप चॅटिंगचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, या चॅटिंगमध्ये 'हवाला' मार्फत पैशांची देवाणघेवाण झाल्याचे ठोस पुरावे आढळले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून लवकरच सक्तवसुली संचालनालय यावर मोठी कारवाई करण्याची चिन्हे आहेत.
डॉ. रवींद्रपाल सिंगच्या जामिनावर ११ मार्चला सुनावणी
डॉ. रवींद्र पाल सिंग याने उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे. २२ जानेवारी २०२६ पासून त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असून, ४ मार्चपर्यंत तब्बल ११ वेळा सुनावणी झाली आहे. मात्र, न्यायालयाने अद्याप जामिनावर कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही.
बुधवारी (४ मार्च) झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पुन्हा एकदा पुढील तारीख दिली असून, आता ११ मार्च रोजी या अर्जावर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.