शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांमुळे जिल्ह्यात शेतकरी असुरक्षित

By admin | Updated: December 18, 2014 00:51 IST

मानवाप्रमाणेच इतरही पशुपक्षांना जिवन जगण्याचा अधिकार आहे. यासाठी शासनाने वन्यजीव संरक्षण फायदा करुन अंमलात आणला.

राजोली : मानवाप्रमाणेच इतरही पशुपक्षांना जिवन जगण्याचा अधिकार आहे. यासाठी शासनाने वन्यजीव संरक्षण फायदा करुन अंमलात आणला. यामुळे जंगलातील प्रत्येक जिवाला कायद्याचे संरक्षण मिळाले आहे. मात्र हा कायदा आता शेतकऱ्यांच्या जिवावर उठला आहे. वन्यप्राण्यांमुळे शेतकरी असुरक्षित असून शेत शिवारात शेतकऱ्यांना जाणे कठिण झाले आहे. वन्यप्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याने आर्थिक ताणही सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार डोळ्यादेखत होत असूनही कायद्याने शेतकरी हतबल ठरत आहे. पेरणीपासून तर पिक हातात येईपर्यंत ग्रामीण भागातील शेतकरी डोळ्यात तेल घालून दिवसरात्र पिकांचे रक्षण करुन संवर्धन करतो. यासाठी त्याला महिण्याकाठी हजारो रुपये खर्च येतो. मात्र वन्यप्राण्याच्या उपद्रवाला शेतकरी रोखण्यास असमर्थ ठरत आहे. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान दरवर्षी होत आहे. शेतीचा कितीही बंदोबस्त केला तरीही उपद्रवी वन्यप्राणी, रानडुकरांच्या टोळ्या शेतात घुसून कोवळी रोपे उपटून खातात. थोडीही नजरचूक झाली तरीही एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत संपूर्ण शेतातील पिक ओरबडतात. हा प्रकार नित्यनेमाचा असल्याने शेतकरी हताश होत आहे.रानडुकरांचा प्रताप याहूनही भयानक आहे. निर्ढावलेले रानडुकरे पिक तुडवून शेताच्या धुऱ्याबांधाचीसुद्धा नासधुस करतात. शेताभोवती काटेरी तारेचे कुंपन केले तरीही त्याला न जुमानता शेतात मुसंडी मारतात. सुरुवातीला फटाक्याच्या आवाजाने रानडुकरे पळून जात होती. मात्र आता हा आवाज नित्याचा व ओळखीचा झाल्याने डुकरे सरळ शेतात घुसून पिकांची प्रचंड हाणी करीत आहे. त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास ते उलट चाल करुन शेतकऱ्यांवर हल्ला करुन जमखी करीत आहे. दरवर्षी या घटनातत वाढ होत आहे. अशावेळी जिवाच्या भितीने शेतकरी शेतीची राखण सोडून घरी राहणे पसंत करीत आहे. यामुळे मात्र रानडुकरांना पूर्ण शेत मोकळे मिळत आहे.वन्यप्राणी शेतीचे नुकसान करीत आहेत. तर दुसरीकडे जंगलात दबा धरुन बसलेली हिंस्त्र पशु शेताच्या कडेने चरत असलेल्या गाई, म्हशी, बैल, शेळ्यांवर शेतकऱ्याच्या डोळ्यादेखतत हल्ला चढवून ठार करीत आहेत. कायदा असल्याने शेतकरी काहीही करु शकत नसून मदतीसाठी केवळ वनाधिकाऱ्याची मनधरणी करीत आहे. मात्र अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायचा तयार नाही. केवळ मोठ्या घटना घटल्या तर अधिकारी घटनास्थळावर येतात. लहानसहान घटनांकडे ते लक्षही देत नाही.वन्यप्राण्यांना कायद्याने संरक्षण देताना शेतकऱ्यांच्या पिकाचा विचार करुन त्यांनी शेतशिवारात किंवा गावाकडे भटकू नये यासाठी उपाय योजना आखायला पाहिजे होती. वनविभाग देत असलेल्या तुंटपूंज्या मदतीसाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या घातक कायद्यात आता बदल करुन शेतकऱ्यांनाही संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे. (वार्ताहर)